Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

‘कळसुबाई’वर अत्याधुनिक सुविधेसह पर्यावरण संरक्षणाची मागणीवनमंत्री गणेश नाईक यांना निवेदन; पाहणीचे आदेश

अकोले : नाशिक व नगर जिल्ह्यांच्या सीमेवरील महाराष्ट्रातील सर्वोच्च कळसुबाई शिखरावर भाविक व पर्यटकांसाठी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबर

अकोलेत दूध वाटून नववर्षाचे स्वागत
सुरज भवारी ‘महाराष्ट्र बिझनेस आयकॉन’ पुरस्काराने सन्मानित
एसबीआयकडून  मृत खातेदारास 2 लाखांची मदत

अकोले : नाशिक व नगर जिल्ह्यांच्या सीमेवरील महाराष्ट्रातील सर्वोच्च कळसुबाई शिखरावर भाविक व पर्यटकांसाठी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच वन्यजीव संरक्षण व पर्यावरण संवर्धनासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी कळसुबाई मित्र मंडळाने केली आहे. या संदर्भात मंडळाचे संस्थापक अध्यक्ष भागीरथ मराडे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने वनमंत्री गणेश नाईक यांची भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर केले.यावेळी वनमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ पाहणी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले असून, लवकरच सकारात्मक निर्णय होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. गेल्या तीन दशकांपासून कळसुबाई  मातेच्या सेवेत कार्यरत असलेल्या गिर्यारोहकांनी निवेदनात नमूद केले की, कळसुबाई शिखर हे धार्मिक, नैसर्गिक व पर्यटनदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे स्थळ असून दरवर्षी लाखो भाविक पर्यटक येथे भेट देतात. मात्र, अलीकडील काळात प्लास्टिक कचरा, पाण्याच्या बाटल्या व अन्नपदार्थांचे अवशेष यामुळे परिसरात अस्वच्छता वाढत असून पर्यावरणीय समतोल व जैवविविधतेला धोका निर्माण होत आहे. तसेच, स्वच्छता सुविधा, कचरा व्यवस्थापन, नियंत्रण यंत्रणा व जनजागृतीच्या अभावामुळे ही समस्या गंभीर होत असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या उपाययोजना तातडीने राबविल्यास कळसुबाई शिखराचे नैसर्गिक सौंदर्य अबाधित राहील, पर्यावरण संवर्धनाला चालना मिळेल तसेच स्थानिकांना रोजगाराच्या संधीही निर्माण होतील, असा विश्वास मंडळाने व्यक्त केला. या वेळी अनिल भोपे, कैलास कडू, प्रवीन भटाटे, महेंद्र आडोळे, विकास शेंडगे, निलेश पवार आदी उपस्थित होते.

COMMENTS