Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुख्याध्यापक लव्हाटे ‘आदर्श शिक्षक’ पुरस्काराने सन्मानित 

कोपरगाव शहर : कोपरगाव तालुका विद्यार्थी सहाय्यक समितीच्या वतीने आयोजित आदर्श शिक्षक पुरस्कार व साईभूमी गौरव पुरस्कार वितरण समारंभात कर्मवीर भाऊरा

इन्स्टाग्रामवर पिस्टलचा फोटो; दोघांविरुद्ध गुन्हा; एआयच्या मदतीने बनावट फोटो तयार; कोपरगाव पोलिसांची कारवाई
श्री स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथीनिमित्त कोपरगावात उत्साहात
‘सोमैया’च्या 20 विद्यार्थ्यांची आयटी कंपनीत निवड

कोपरगाव शहर : कोपरगाव तालुका विद्यार्थी सहाय्यक समितीच्या वतीने आयोजित आदर्श शिक्षक पुरस्कार व साईभूमी गौरव पुरस्कार वितरण समारंभात कर्मवीर भाऊराव पाटील माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक काशिनाथ दामोदर लव्हाटे यांना आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा सोहळा सोमवारी (दि. ३० मार्च) दुपारी ३ वाजता उत्साहात पार पडला. शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेले प्रयत्न तसेच विविध शैक्षणिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग या योगदानाबद्दल लव्हाटे यांचा गौरव करण्यात आला. या प्रसंगी आमदार आशुतोष काळे व संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे, गोदावरी दूध संघाचे चेअरमन राजेश परजणे, माजी नगराध्यक्ष पद्मकांत कुदळे, संजय सातभाई, कोपरगाव तालुका विद्यार्थी सहाय्यक समितीचे डॉ. हिरालाल महानुभाव यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, शिक्षक तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS