Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भाळवणीत भारनियमनाविरोधात महावितरण कार्यालयावर मोर्चा

भाळवणी : पारनेर तालुक्यातील भाळवणी येथे सततच्या भारनियमनाच्या विरोधात येथील ग्रामस्थांनी वीज वितरणाच्या कार्यालयावर मोर्चा नेत आपला रोष व्यक्त कर

आंतरराष्ट्रीय छायाचित्रण स्पर्धेत शिवराज भालेकरला सुवर्णपदक
नैसर्गिक ऑक्सिजनची खऱ्या अर्थाने गरज : डॉ. कदम
पारनेरमध्ये कामगारांना जीवनावश्यक साहित्याचे वाटप

भाळवणी : पारनेर तालुक्यातील भाळवणी येथे सततच्या भारनियमनाच्या विरोधात येथील ग्रामस्थांनी वीज वितरणाच्या कार्यालयावर मोर्चा नेत आपला रोष व्यक्त करत निवेदन सादर केले. गेल्या काही दिवसांपासून भाळवणी व परिसरातील वाड्यावस्त्यांवर रात्री ६ ते १० या वेळेत भारनियमन केले जाते. याचा फटका येथील व्यावसायिक, विद्यार्थी व दूध उत्पादकांना मोठ्या प्रमाणात बसत आहे. सततच्या त्रासाला कंटाळून ग्रामस्थांनी मोर्चाने जात महावितरणचे शाखा अभियंता विलास पाटील यांना निवेदन देत चर्चा केली. यावेळी वरिष्ठांशी बोलून सकारात्मक तोडगा काढण्याचे आश्वासन दिले.

 यावेळी पारनेर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती बाबाजी तरटे, माजी पंचायत समिती सदस्य विकास रोहोकले, तालुका दूध संघाचे चेअरमन संदीप ठुबे, बबनराव भुजबळ, दत्तात्रय रोहोकले, ढवळपुरी येथील दुर्गादेवी दूध संकलन केंद्राचे संचालक सुखदेव चितळकर, संभाजी आमले, संदीप रोहोकले, अविनाश राऊत, प्रमोद गोडसे, जितेंद्र रोहोकले, योगेश शिंदे, युवराज रोहोकले, अमोल पवार, विकास चेमटे, सुनील चेमटे, मनोहर पारखे, प्रकाश रोहोकले, गणेश तळेकर, लहान रोहोकले, सर्जेराव रोहोकले, भागुजी रोहोकले, बी. वाय. रोहोकले, राजेंद्र मुगदे, विठ्ठल रोहोकले, निवृत्ती रोहोकले, सनी कदम, ज्ञानदेव रोहोकले,बाबाजी चेमटे आदींसह व्यावसायिक,दुध उत्पादक शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS