Homeताज्या बातम्या

राहता तहसीलच्या ‘संजय गांधी’ विभागात सावळागोंधळ?नागरिकांची तक्रार ; कायमस्वरूपी कर्मचारी नियुक्त करण्याची मागणी  

राहाता : राहाता तहसील कार्यालयातील संजय गांधी निराधार योजना विभागाच्या कारभाराबाबत नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण असून लाभार्थ्यांना विविध कामांस

वीजबिल शून्यावर आणणारा विद्यार्थ्यांचा सोलर प्रोजेक्ट !सोनिया गांधी पॉलीटेक्निकच्या विद्यार्थ्यांची उल्लेखनीय कामगिरी
अचानक पावसाचा कांदा उत्पादकाला जबर फटका
ट्रस्टच्या जागेवरील तारेचे कंपाऊंड तोडून ताबा मारणाऱ्या समाजकंटकांवर कारवाई करण्याची मागणी
संजय गांधी निराधार योजना - पेंशन योजना - ट्रैक2ट्रेनिंग


राहाता : राहाता तहसील कार्यालयातील संजय गांधी निराधार योजना विभागाच्या कारभाराबाबत नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण असून लाभार्थ्यांना विविध कामांसाठी वारंवार फेऱ्या माराव्या लागत असल्याची तक्रार होत आहे. विभागात कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने कामकाजावर परिणाम होत असल्याचा आरोपही नागरिकांकडून करण्यात येत आहे.
तालुक्यातील वृद्ध, अपंग तसेच निराधार लाभार्थ्यांना विविध प्रकरणांच्या पाठपुराव्यासाठी अनेकदा तहसील कार्यालयात जावे लागत असल्याचे सांगितले जात आहे. काही लाभार्थ्यांची प्रकरणे मंजूर होऊनही प्रत्यक्ष लाभ मिळण्यास विलंब होत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.
विभागातील कामकाजासाठी अनधिकृत व्यक्तींचा वापर होत असल्याचा आरोपही काही नागरिकांनी केला आहे. यामुळे लाभार्थ्यांची गैरसोय होत असून संबंधित विभागात नियमित व जबाबदार कर्मचारी नियुक्त करण्याची मागणी होत आहे.
तहसील कार्यालयातील विविध विभागांच्या कामकाजाबाबत यापूर्वीही नागरिकांनी तक्रारी केल्याचे सांगितले जात आहे. संजय गांधी विभागातील काही प्रकरणे प्रलंबित असल्याने लाभार्थ्यांना आपल्या अर्जांची माहिती मिळविण्यासाठी वारंवार कार्यालयात जावे लागत असल्याची खंत व्यक्त केली जात आहे.
 लाभार्थ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन विभागातील रिक्त पदे तातडीने भरावीत, प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करावा आणि नागरिकांना वेळेत सेवा मिळावी, अशी मागणी होत आहे.
सहा महिने उलटले; लाभ मिळालेला नाही
“माझे संजय गांधी निराधार योजनेचे प्रकरण पात्र ठरून जवळपास सहा महिने झाले आहेत. याबाबत चौकशी करण्यासाठी विभागात गेल्यानंतर समाधानकारक माहिती मिळत नाही. दूरध्वनीवर संपर्क साधण्याचाही प्रयत्न केला, मात्र प्रतिसाद मिळाला नाही,” अशी तक्रार एका शिंदे नावाच्या लाभार्थीने केली.

COMMENTS