कोपरगाव : कोपरगाव बाजार समितीच्या माध्यमातून शेतकरी हिताचे काम सुरू असून कोल्हे गटाचे सभापती साहेबराव रोहोम यांच्या कार्यकाळात वेगाने कामे होत अस

कोपरगाव : कोपरगाव बाजार समितीच्या माध्यमातून शेतकरी हिताचे काम सुरू असून कोल्हे गटाचे सभापती साहेबराव रोहोम यांच्या कार्यकाळात वेगाने कामे होत असल्याने विरोधी काळे गटाला आपली पाठीमागील काळातील निष्क्रियता झाकण्यासाठी निराधार आरोप करून नाटक करण्याची दुर्दैवी वेळ आल्याचा घणाघात संचालक प्रकाश गोर्डे यांनी केला.
अनेक वर्षे काळे गटाचे सभापती राहून गेले आहे. मात्र धामोरी मोर्विस उपबाजार समिती त्यांना कधीही सुरू करत आली नाही. बिपीन कोल्हे, माजी.आ. स्नेहलता कोल्हे, आ.विवेक कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली सभापती रोहोम यांचे प्रभावी काम सुरू असल्याचा त्रास काळे गटाला होत आहे.
रांजणगाव, धामोरी मोर्विस या उपबाजार प्रगतीत असून कोपरगाव बाजार समितीचे उत्तन एक कोटींचे उत्पन्न पाच कोटींवर गेले,पाच लाख क्विंटल वरून पंचवीस लाख क्विंटल आवक कांद्याची झाली, पाच कोटींचे कामे पूर्ण होऊन आगामी सहा कोटींचे कामे प्रगतीपथावर आहे याचे दुःख काळे गटाला झाले आहे.
यासह विकास कामाच्या मंजुरी घेत असताना ए.आर. डी.डी.आर. जॉइंट रजिस्टर,पणन संचालक यांच्या मंजुरी घ्याव्या लागतात.टेंडर प्रोसेसिंग यात वेळ लागतो व मागील वर्षी चार महिने पाऊस असल्या कारणाने तेथे इतर कामे झाले नाही त्यामुळे वर्ष लागले.व्यापारी लायसन यासाठी देखील प्रक्रियेला कालावधी लागतो याचा अभ्यास नसल्याने बालिशपणाचे कृत्य विरोधक करत आहे त्याला फार महत्व नाही.
आगामी महिना भरात उपबाजार चालू करणार आहोत त्यामुळे होणाऱ्या कामाचे श्रेय मिळण्यासाठी केविलवाणी धडपड काळे गटाची सुरू आहे. वास्तविक पाहता त्यांच्या नेत्यांनी संपूर्ण तालुक्यावरच अन्याय केलेला आहे. चार हजार कोटीचे खोटे बोलून आणि समन्यायी पाणी वाटप कायदा करून तीन पिढ्यांचे नुकसान करणाऱ्या काळे गटाला कोल्हे कुटुंबावर आरोप करण्याची नैतिकता नाही याची जाणीव त्यांच्या कार्यकर्त्यांनी ठेवावी आणि मगच बिनबुडाचे आरोप करावे असे परखड उत्तर संचालक प्रकाश गोर्डे यांनी दिले आहे.

COMMENTS