कोपरगाव शहर : मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत धोत्रे गावची विकास झेप तालुकास्तरीय पाहणी समितीकडून गुणांकन आधारे धोत्रे ग्रामपंचायत ने

कोपरगाव शहर : मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत धोत्रे गावची विकास झेप तालुकास्तरीय पाहणी समितीकडून गुणांकन आधारे धोत्रे ग्रामपंचायत ने प्रथम क्रमांक मिळविला. या अभियानात कोपरगाव तालुक्यातील एकूण २१ ग्रामपंचायतीने सहभाग घेतला होता. या सर्व ग्रामपंचायतचे तपासणी करणे कामी बीड जिल्ह्यातील आष्टी पंचायतसमितीचे गटविकास अधिकारी व त्यांचे सर्व टीम कोपरगाव तालुक्यातील गावांना भेट देऊन विकासाची पाहणी केली. यात कोपरगावचे पूर्व भागातील धोत्रे ग्रामपंचायत ने विविध विकास कामे नाविन्यपूर्ण उपक्रमाची तपासणी समितीकडून पाहणी करण्यात आली स्मशान भूमी शुशोभीकरण,आदर्श जि.प. शाळा, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, वाचनालय, संगणीकृत ग्रामपंचायत, पिण्याचे जलशुद्धीकरण आरो फिल्टर प्लॅन्ट,घनकचरा व्यवस्थापन,सांडपाणी व्यवस्थापन तसेच रस्ता दुतर्फा वृक्ष लागवड, सार्वजनिक स्वच्छता, श्रमदान आरोग्याचे विविध शिबिरे, इत्यादी विविध उपक्रमामध्ये उल्लेखनीय कामकाज केले आहे . धोत्रे ग्रामपंचायत ने कोपरगाव तालुक्यात प्रथम क्रमांकाचे मानांकन घेऊन १५ लाख रुपये रकमेचे बक्षिसाचे मानकरी झाले. या अभियानात धोत्रे ग्रामस्थांचा उत्साह आणि सहभाग मोठ्या प्रमाणात होता.
सरपंच प्रदीप विठ्ठलराव चव्हाण व ग्रामपंचायत अधिकारी अविनाश पगारे व सर्व सदस्य, कर्मचारी वृंद यांनी यापुढील कार्यकाळात धोत्रे ग्रामपंचायत विविध अभियानाद्वारे कामकाज करत राहील व सर्वसामान्य नागरिकांच्या सेवेसाठी तत्पर राहील अशी ग्वाही दिली. मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान राबविणे कामे कोपरगाव पंचायत समितीचे सन्माननीय गट विकास अधिकारी संदीप दळवी, विस्तार अधिकारी प्रशांत तोरवणे,बबन वाघमोडे यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभले. धोत्रे ग्रामपंचायतचे तालुक्याचे विविध स्तरावरून अभिनंदन होत आहे.

COMMENTS