Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पूरग्रस्तांना 10 हजाराची मदत

उपमुख्यमंत्री अजित पवारांची विधिमंडळात घोषणा

मुंबई/प्रतिनिधी ः महाराष्ट्रात पावसाने धुमाकूळ घातला असून, विदर्भ, मराठवाडा आणि पश्‍चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झालेली आह

देशाला मोदींशिवाय पर्याय नाही
अशोक चव्हाण-अजित पवारांमध्ये ’गुफ्तगू’
वय झाले, आतातरी थांबणार की नाही ?

मुंबई/प्रतिनिधी ः महाराष्ट्रात पावसाने धुमाकूळ घातला असून, विदर्भ, मराठवाडा आणि पश्‍चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झालेली आहे. यात अनेक शेतकर्‍यांची पिके पाण्यात गेली, तर अनेकांचा संसार पाण्यात गेले, त्यामुळे पूरगस्तांना मदतीची मागणी होत होती, अखेर सोमवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधिमंडळात पूरग्रस्तांसाठी 10 हजार रुपयांची मदत जाहीर केली. सरकार सगळ्यांना मदत करणार असल्याचे आश्‍वासन अजित पवारांनी दिले आहे.
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पूरग्रस्तांना सरकार 10 हजार रुपयांची तातडीची मदत करणार आहे. यात पुरामुळे दुकानांचे नुकसान झाल्यास 50 हजार रुपयांची मदत केली जाईल. तसेच पुरात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 4 लाख रुपयांची नुकसान भरपाई दिली जाईल. 19 जुलै रोजी राज्याच्या विविध जिल्ह्यांत अतिवृष्टी झाली. यवतमाळ, बुलडाणा, वाशिम या जिल्ह्यांमध्ये प्रचंड पाऊस पडला. यवतमाळमध्ये 110 नागरिकांना एनडीआरएफने सुरक्षित स्थळी हलवले. याकामी हेलिकॉप्टरचीही मदत घेण्यात आली, असे अजित पवार यांनी विधान परिषदेत बोलताना सांगितले. पुरामुळे नुकसान झालेल्या विद्यार्थ्यांना शिक्षण साहित्य देण्यात येणार आहे, तसेच दुबार पेरणीकरता बियाणेही उपलब्ध होतील, शेतकरी अडचणीत येणार नाही. शेती पिकांच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने सुरू करणार आहोत, अशी ग्वाही अजित पवारांनी दिली आहे. तसेच आपण एनडीआरएफपेक्षा जास्त मदत केली आहे. पुरामुळे गावातले रस्ते खराब झाले असतील तर बांधकाम विभाग रस्ते दुरूस्त करतील, असेही अजित पवार म्हणाले. ’19 ते 23 जुलै दरम्यान यवतमाळ, बुलडाणा, अकोला, वाशीम येथे पीक मालमत्ता नुकसान झाले. 23 जुलैला पाहणी केली. पिकांचे नुकसान झाले आहे, त्यांना मदत करणार, धानाचा पुरवठा करणार. घरात पाणी शिरले आहे, त्यांना पहिले पाच हजारांची मदत मिळत होती. आता ही मदत 10 हजार रुपये दिली जाईल. केवायसी केलेल्या शेतकर्‍यांना 7 दिवसांच्या आत मदत दिली जाईल. दुकानाचे नुकसान झाल्यास आधी मदत दिली जात नव्हती, आता 50 हजार रुपये दिली जातील,’ अशी माहिती अजित पवारांनी दिली. ’चंद्रपुरात मोठे नुकसान झाले आहे, मुख्यमंत्री आणि मंत्री घटनास्थळी गेल्यानंतर कामाला वेग आलेला पाहायला मिळाला. सर्व जिल्हाधकार्‍यांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बैठक घेतली जाईल, त्यानंतर आवश्यकतेनुसार आदेश दिले जातील, सरकार कुणालाही निधीची कमतरता भासू देणार नाही. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने एनडीआरएफच्या मदतीपेक्षा जास्त मदत दिली आहे. सरकार सर्वांना मदत करेल,’ असे अजित पवार यांनी यावेळी स्पष्ट केले.

तातडीने पिक पंचनामे करण्याचे निर्देश – बुलडाणा, यवतमाळ, वर्धा कोल्हापूर जिल्ह्यातील पावसाने पिकांचे नुकसान झाले आहे, त्याठिकाणी तातडीने पिक पंचनामे करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिले आहेत. बुलडाणा जिल्ह्यात 102 मिलीमीटर पाऊस झाला. यामुळे तेथील नदी-नाल्यांना पूर आला होता. वाशिममध्ये 139.7 मिलीमीटर पाऊस झाला. सरकारने वेगवेगळ्या जिल्ह्यांत मदतकार्य करण्यासाठी काही पथके तैनात केली आहेत. या पावसात मृत पावलेल्यांच्या कुटुंबीयांना 4 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. विशेषतः सरकारने तातडीने पिकांचे पंचनामे करण्याचेही निर्देश दिलेत.

COMMENTS