Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शेवगाव नगरपरिषदेच्या अग्निशामक वाहनाचे लोकार्पण

शेवगाव : शहरातील आपत्कालीन सेवांना बळकटी देण्यासाठी शेवगाव नगरपरिषदेच्या ५५ लाख रुपये किमतीच्या अत्याधुनिक अग्निशामक वाहनाचे लोकार्पण बुधवारी (दि

जयपूर-बिहार महामार्गावर बसला भीषण आग; प्रवासी नसल्याने अनर्थ टळला!
उत्तरप्रदेशातील अपघातात 11 जणांचा होरपळून मृत्यू
मुंबईत मध्यरात्री थरार! सायन प्रतीक्षा नगर बस डेपोत भीषण आग; दोन बसेस जळून खाक!

शेवगाव : शहरातील आपत्कालीन सेवांना बळकटी देण्यासाठी शेवगाव नगरपरिषदेच्या ५५ लाख रुपये किमतीच्या अत्याधुनिक अग्निशामक वाहनाचे लोकार्पण बुधवारी (दि. ६) सकाळी ११ वाजता क्रांती चौक येथे उत्साहात पार पडले.

शिवसेना (शिंदे गट) नेते अरुण मुंढे यांच्या हस्ते नारळ वाढवून या वाहनाचे उद्घाटन करण्यात आले. यानंतर सदरील अग्निशामक गाडी अधिकृतपणे नगरपरिषदेच्या सेवेत दाखल करण्यात आली.

 या कार्यक्रमाला नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी विजया घाडगे, शेवगाव पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष संजय कोळगे, माजी उपनगराध्यक्ष वजीर पठाण, साईनाथ आधाट, तसेच नगरसेवक आशुतोष डहाळे, ताहेर पटेल, हरीश भारदे, कैलास तिजोरे, सुनील काकडे, संतोष जाधव, प्रवीण भारस्कर आदींसह विविध पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 यावेळी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांचे नगरसेवकही उपस्थित होते. कार्यक्रमाला नागरिकांचीही मोठी उपस्थिती लाभली.

 दरम्यान, काही दिवसांपूर्वी शहरातील बॉम्बे मशिनरी या दुकानाच्या गोडाऊनला भीषण आग लागली होती. त्या वेळी अग्निशामक वाहन उपलब्ध नसल्यामुळे आग नियंत्रणात आणण्यात अडचणी निर्माण झाल्या होत्या आणि गोडाऊन पूर्णतः जळून खाक झाले होते. या घटनेनंतर नगरपरिषदेवर सर्व स्तरांतून टीका होत होती. नव्याने दाखल झालेल्या या अग्निशामक वाहनामुळे भविष्यात अशा आपत्तींचा अधिक प्रभावीपणे सामना करता येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

COMMENTS