Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

NEET परीक्षा यंत्रणेची जबाबदारी ‘UPSC’ कडे सोपवा; ॲड. प्रकाश आंबेडकरांची मागणी; केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचीही केली जोरदार मागणी

मुंबई : वैद्यकीय प्रवेशासाठी (Medical Admission) घेतल्या जाणाऱ्या राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षेत (NEET) झालेल्या प्रश्नपत्रिका गळती प्रकरणाम

आंदोलन की राजकीय महत्त्वाकांक्षा : एक कटाक्ष
पुण्यात उद्या ‘कॉकरोच जनता पक्षाचे आंदोलनकेंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची प्रमुख मागणी
22 लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात पेपर लीक प्रकरणात सीबीआय चौकशी करा- नितीन सोनवणेभारत सरकारचे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या
NEET Paper Leak 2026: धर्मेंद्र प्रधान अजूनही खुर्चीला चिकटून का? प्रकाश  आंबेडकरांचा थेट सवाल

मुंबई : वैद्यकीय प्रवेशासाठी (Medical Admission) घेतल्या जाणाऱ्या राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षेत (NEET) झालेल्या प्रश्नपत्रिका गळती प्रकरणामुळे देशातील राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी केली आहे. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ चालवला असल्याचा आरोप करत त्यांनी सध्याच्या परीक्षा यंत्रणेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.

ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून केंद्रीय शिक्षण मंत्र्यांवर कडक शब्दांत टीका केली. “देशातील लाखो विद्यार्थ्यांनी प्रचंड मेहनत घेऊन परीक्षा दिल्यानंतर प्रश्नपत्रिका गळतीचे प्रकार उघडकीस येणे अत्यंत गंभीर आहे. विद्यार्थ्यांच्या कष्टावर पाणी फेरले गेले असून, या संपूर्ण प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून धर्मेंद्र प्रधान यांनी तातडीने आपल्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे,” अशी मागणी त्यांनी केली.

३ मे रोजी पार पडलेल्या या वैद्यकीय प्रवेश परीक्षेनंतर अवघ्या काही दिवसांतच पेपर फुटीच्या आरोपांनी जोर धरला होता. राष्ट्रीय परीक्षा संस्थेवर (NTA) सर्व स्तरातून टीका झाल्यानंतर अखेर परीक्षा रद्द करून ती नव्याने घेण्याची घोषणा करण्यात आली. या निर्णयामुळे देशभरातील लाखो विद्यार्थी आणि पालकांमध्ये मोठा संभ्रम व मानसिक ताण निर्माण झाला आहे. या प्रकरणात आतापर्यंत अनेक संशयितांना अटक करण्यात आली असून, तपास यंत्रणा वेगवेगळ्या राज्यांमध्ये चौकशी करत आहेत. या गैरप्रकारामुळे संपूर्ण परीक्षा प्रक्रियेच्या पारदर्शकतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

परीक्षा यंत्रणेत बदलाची मागणी: ॲड. आंबेडकर यांनी परीक्षा व्यवस्थेतील त्रुटींवर भाष्य करताना महत्त्वाची मागणी केली. “वैद्यकीय प्रवेश परीक्षा घेण्याची संपूर्ण जबाबदारी आता केंद्रीय लोकसेवा आयोगाकडे (UPSC) सोपवावी. लोकसेवा आयोगाची परीक्षा पद्धती अधिक काटेकोर आणि विश्वासार्ह मानली जाते. त्यामुळे भविष्यात अशा प्रकारच्या गैरप्रकारांना आळा बसेल,” असे त्यांनी नमूद केले. या पेपर फुटीच्या प्रकारामुळे देशभरात विद्यार्थी आणि पालकांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण असून विविध राज्यांमध्ये आंदोलने सुरू झाली आहेत.

COMMENTS