Homeताज्या बातम्या

धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीला यश; बीडमधील ‘विद्यार्थी जनक्रांती रॅली’ स्थगित

बीड: नीट परीक्षा पेपरप्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी बीड येथे सोमवारी आयोजित करण्यात आलेली विद्य

अण्णा हजारे विद्यार्थ्यांच्या पाठिंब्यासाठी मैदानात; अहिल्यानगरमध्ये मौन आंदोलनाला सुरुवात
धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर नांदेड काँग्रेसचा विजय मार्च; ’लोकशाहीचा विजय’ असल्याचा दावा
धर्मेंद्र प्रधानांची भूमिका संवेदनशील; शेतकरी कर्जमुक्तीचा शब्दही सरकारने पाळला: खा. अशोकराव चव्हाण

बीड: नीट परीक्षा पेपरप्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी बीड येथे सोमवारी आयोजित करण्यात आलेली विद्यार्थी जनक्रांती रॅली स्थगित करण्यात आली आहे. विद्यार्थी जनक्रांती रॅली समिती, बीड जिल्हा यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

आंदोलनाचा प्रमुख मुद्दा असलेल्या धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी पूर्ण झाल्याचे तसेच आंदोलनातील इतर प्रमुख मागण्यांवरही सरकारकडून सकारात्मक निर्णय घेण्यात आल्याचा दावा समितीने केला आहे. समितीच्या माहितीनुसार, आंदोलनात सहभागी विद्यार्थ्यांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यास मान्यता देण्यात आली असून, आत्महत्याग्रस्त विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी १ कोटी रुपयांची आर्थिक मदत देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. त्यामुळे आंदोलनातील प्रमुख मागण्या मान्य झाल्याने हा विद्यार्थी एकजुटीचा विजय असल्याचे समितीने म्हटले आहे.

या पार्श्वभूमीवर सोमवारी दि. २७ जुलै रोजी किल्ला मैदान (बलभीम महाविद्यालय परिसर) येथून काढण्यात येणारी विद्यार्थी जनक्रांती रॅली स्थगित करण्यात येत असल्याची अधिकृत घोषणा समितीच्या वतीने करण्यात आली.

बैठकीस प्रा. सुशीलाताई मोराळे, प्रा. सविता शेटे, कॉ. नामदेव चव्हाण, डी. जी. तांदळे, दादासाहेब मुंडे, एमआयएम जिल्हाध्यक्ष शेख शफिक, डॉ. गणेश ढवळे, आम आदमी पार्टीचे अशोकराव येडे, बाळासाहेब मोरे, नगरसेवक अमर शेख, शेतकरी नेते राजेंद्र आमटे, पंडित तुपे, परवेज कुरेशी, नितीन जायभाय, सुहास जायभाय, अभिषेक शिंदे, सय्यद अब्दुल करीम, अलीम कुरेशी, बाजीराव ढाकणे, शेख आदानान, अविनाश डरफे, कमरुल इमान यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. विद्यार्थी जनक्रांती रॅली समिती, बीड जिल्हा यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली.

COMMENTS