Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

विशेष रस्ता अनुदानाच्या 11 कोटीला नगरविकासची स्थगिती; इस्लामपूरात श्रेयवादाचे राजकारण पेटले

इस्लामपूर / प्रतिनिधी : इस्लामपूर पालिका निवडणूक जस जशी जवळ येताच पालिकेतील सत्ता संघर्ष शिगेला पोहोचला आहे. सत्ताधारी शिवसेनेने विकास कामांसाठी

अत्याचारप्रकरणी युवकास अटक
कोयना भूकंपग्रस्त कुटुंबियांना अखेर 27 वर्षांनंतर न्याय
जरंडेश्‍वरला भुयारी मार्गात दगडगोटे

इस्लामपूर / प्रतिनिधी : इस्लामपूर पालिका निवडणूक जस जशी जवळ येताच पालिकेतील सत्ता संघर्ष शिगेला पोहोचला आहे. सत्ताधारी शिवसेनेने विकास कामांसाठी मंजूर करुन आणलेल्या 11 कोटींच्या निधि वरुन महाविकास आघाडीतील मित्र पक्ष राष्ट्रवादी व शिवसेनेत राजकारण रंगले असतानाच या 11 कोटींच्या निधीला स्थगित देण्यात येत असल्याचा नवा अध्यादेश नगरविकास विभागाने काढला आहे. त्यामुळे या निधिच्या स्थगितीमागे नेमके राजकारण काय? याची चर्चा शहरात रंगली आहे.
शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आनंदराव पवार यांनी विकास आघाडी-शिवसेनेचा सत्ताकाळ संपत आला असताना शहरातील रस्ते व गटर कामांच्यासाठी 11 कोटींचा निधी मंजूर करुन आणला होता. हा निधी मंजूर करत असल्याचा अध्यादेश दि. 2 नोव्हेंबर रोजी नगरविकास विभागाने काढला होता. शहराच्या विकासासाठी एकाचवेळी एवढा मोठा निधी मंजूर झाल्याचे सांगत शिवसेने आनंदोत्सव साजरा केला होता. मात्र, हा निधी मंजूर होवून 15 दिवस होण्याआधीच या अध्यादेशाला स्थगिती देण्यात येत असल्याचा नवा अध्यादेश सोमवारी नगरविकास विभागाने काढला. त्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
मंजूर 11 कोटी रुपयांच्या निधीतून कामे प्रस्तावित करण्यासाठी सत्ताधाय्रांनी बोलविलेल्या अतितातडीच्या विशेष सभेला राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी सलग तीन वेळा दांडी मारली होती. त्यामुळे या निधीला राष्ट्रवादीचा विरोध आहे, असा आरोप विकास आघाडी व शिवसेनेने राष्ट्रवादीवर केला होता. तर पहिली विशेष सभा तहकूब असताना दुसरी सभा घेता येते का? असा सवाल राष्ट्रवादीने केला होता. यावरुन राजकारण रंगले असताना विकास आघाडी-शिवसेनेचा सत्ताकाळ संपण्यआधी हा निधी पालिकेकडे येवून प्रत्यक्ष कामावर खर्च होणार का नाही याची चर्चा शहरात रंगली होती. तोपर्यंत या निधीला स्थगिती आल्याने या चर्चांना पुर्णविराम मिळून आता ही स्थगिती आणण्यामागे नेमका कोणाचा हात आहे? स्थगिती आणण्याचे कारण काय? याची चर्चा सुरु झाली आहे. आता यापुढे विकासआघाडी-शिवसेना काय भुमिका घेणार याकडे शहरवासियांचे लक्ष लागून राहिले आहे.

COMMENTS