Homeताज्या बातम्या

जनार्दन स्वामींच्या समाधीस्थानी गुरुपौर्णिमा उत्सवाचे आयोजन; बेट-कोपरगाव येथे धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल

कोपरगाव: राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी (मौनगिरी) महाराज समाधीस्थान, बेट-कोपरगाव येथे बुधवारी, २९ जुलै रोजी भव्य गुरुपौर्णिमा उत्सवाचे आयोजन क

पुणे-नाशिक महामार्गावर वाकीजवळ भीषण अपघात; कंटेनर डिव्हायडर तोडून ट्रकला धडकला, कार दाबली, सुदैवाने जीवितहानी टळली!
अहंकाराचा त्याग करून विठ्ठलभक्तीत लीन व्हा : हभप चेडे; शेवगाव येथील दध्नेश्वर शिवालयात विशेष हरिकीर्तन महोत्सव संपन्न
देवशयनी आषाढी एकादशी: किनवट परिसर विठ्ठलनामाच्या गजराने दुमदुमला; मंदिरांमध्ये भाविकांची मांदियाळी
Janardan Swami - PLAYBOARD

कोपरगाव: राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी (मौनगिरी) महाराज समाधीस्थान, बेट-कोपरगाव येथे बुधवारी, २९ जुलै रोजी भव्य गुरुपौर्णिमा उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या उत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

उत्सवानिमित्त पहाटे ४ ते ५ या वेळेत महापूजा, सकाळी ५ ते ६ या वेळेत नित्य नियम विधी, सकाळी ७ वाजता सत्संग, प्रवचन व महाप्रसाद, तसेच प.पू. बाबाजींच्या पालखीची उत्सव मूर्तीची मिरवणूक काढण्यात येणार आहे. सकाळी ८ ते १० या वेळेत समाधी मंदिर परिसरात महापूजा व आरती पार पडणार आहे.

सायंकाळी ७.३० वाजता बाबाजींच्या पालखीची भव्य मिरवणूक काढण्यात येणार असून या सोहळ्यास विविध संत-महंत, भक्तगण व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त सर्व गुरुबंधू, गुरुभगिनी आणि भाविकांनी दर्शन, पूजन व महाप्रसादाचा लाभ घ्यावा, तसेच सर्व धार्मिक कार्यक्रमांत उत्साहाने सहभागी व्हावे, असे आवाहन श्री संत सद्गुरू जनार्दन स्वामी (मौनगिरी) महाराज समाधीस्थान, बेट-कोपरगाव येथील विश्वस्त मंडळ व उत्सव समितीने केले आहे.

COMMENTS