शेवगाव: एखाद्याला केलेली मदत लोकांच्या दृष्टीने किरकोळ व अत्यल्प वाटत असली तरी गरजू व गरजवंतांच्या दृष्टीने तिला अनमोल पद्धतीचे महत्त्व असते. सेव

शेवगाव: एखाद्याला केलेली मदत लोकांच्या दृष्टीने किरकोळ व अत्यल्प वाटत असली तरी गरजू व गरजवंतांच्या दृष्टीने तिला अनमोल पद्धतीचे महत्त्व असते. सेवा व समर्पण हेच रोटरीचे कार्य असल्याचे प्रतिपादन रोटरी इंटरनॅशनलचे माजी प्रांतपाल डॉ. हरिप्रसाद सोमानी यांनी केले.
रोटरी क्लब ऑफ शेवगाव सिटीचे नूतन अध्यक्ष रो. डॉ. पुरुषोत्तम बिहाणी, सचिव रो. प्रा. डॉ. गजानन लोंढे, खजिनदार रो. अशोक लबडे यांच्यासह कार्यकारिणी सदस्यांच्या आयोजित पदग्रहण समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
कार्यक्रमादरम्यान रोटरीचे सह प्रांतपाल रो. डॉ. भागनाथ काटे, मावळते अध्यक्ष रो. युसुफखान पठाण आणि सचिव रो. प्रा. विजय मुधोळकर यांनी रोटरीच्या गतवर्षीच्या कामाचा अहवाल सादर केला. तर नूतन अध्यक्ष डॉ. बिहाणी व त्यांच्या सहकाऱ्यांनी नवीन वर्षातील कामकाजाचा आराखडा आणि लेखाजोखा मांडला.
विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती
या सोहळ्याला सामाजिक कार्यकर्ते शिवाजीराव भुसारी, नगरसेवक सुनील काकडे, नितीन दहीवालकर, नीरज लांडे, विनोद मोहिते, सागर फडके, खंडूभाऊ बुलबुले, संतोष जाधव, संजय फडके, कचरू सारडा, डॉ. सुभाष बाहेती, कारभारी नजन, केदारेश्वर कारखान्याचे उपाध्यक्ष माधव काटे, डॉ. सुयोग बाहेती, डॉ. संजय लड्डा, डॉ. विकास बेडके, अंधमुक्त व्हिलेजचे डायरेक्टर रो. बाळासाहेब चौधरी, डॉ. सौ. मनीषा लढ्ढा, सेवानिवृत्त उपप्राचार्य रो. किसनराव माने, डॉ. आशिष लाहोटी, इनरव्हील क्लबच्या नूतन अध्यक्ष रूपाली तडवळकर, वसुधा सावरकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
द्वारकानाथ लाहोटी यांचा सत्कार
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते द्वारकानाथ लाहोटी यांनी बस स्थानकावरील पानपोईच्या नूतनीकरणासाठी रोटरी क्लबला १ लाख रुपयांची मदत दिल्याबद्दल प्रमुख अतिथींच्या हस्ते त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी प्राचार्य रो. दिलीप फलके यांनी केले, तर नूतन सचिव डॉ. गजानन लोंढे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

COMMENTS