Homeताज्या बातम्या

अकोलेत ‘बफर स्टॉक’ तातडीने खुला करा; खत तुटवड्याबाबत ग्राहक पंचायतचे तहसीलदारांना निवेदन

अकोले: अकोले आदिवासी भागामध्ये पावसाळ्यात खरिपाच्या हंगामात आवश्यक रासायनिक खतांचा तुटवडा निर्माण झाला आहे. ही व्यावसायिकांनी रासायनिक खतांची निर्माण केलेली कृत्रिम टंचाई आहे. याचा परिणाम सर्व सामान्य शेतऱ्यांना यूरिया खताची एकही गोणी मिळू शकत नाही. यामुळे अनेक आदिवासी शेतकरी खतांपासून वंचित आहेत. तातडीने शेतकऱ्यांना युरिया खत उपलब्ध करून द्यावित व शासनाच्या ताब्यात असलेल्या युरियाचा ‘बफर स्टॉक’ तात‌डीने खुला करावा अशी मागणी ग्राहक पंचायतने केली आहे.  याबाबत त्यांनी  तहसीलदार अकोले व तालुका कृषी अधिकारी  यांना निवेदन दिले आहे.  जुन,जुलै मध्ये झालेल्या अवकाळी व अतीवृष्टीच्या पावसाने शेतकरी राजा अगोदरच उध्वस्त झालेला आहे. तशातच तरीही अडचणीतून बी-बियाणे, पैशाची ऊसनवारी करून खरेदी करायला सुरुवात केली. भात लागवडीसाठी युरिया खताची गरज भासत आहेत खत न मिळाल्याने पेरण्यांमध्ये व भात लावणीस विलंब, उशीर होत आहे व सोयाबीन, भुईमूग, बाजरी, मका इतर, पिकासाठी शेतकऱ्यांना युरिया खताची अत्यंत गरज भासत आहे. तात्काळ युरिया खत उपलब्ध करून द्या ‘बफर स्टॉक’ तातडीने खुला करण्यात यावा असे निवेदनात म्हटले आहे.  निवेदनावर ग्राहक पंचायतचे जिल्हा उपाध्यक्ष मच्छिंद्र मंडलीक, तालुका अध्यक्ष दत्ता शेनकर, कार्याध्यक्ष महेश नवले, सचिव राम रुद्रे, रामदास पांडे, अनंत घाणे, गंगाराम धिंदळे, मोहन मुंढे, सुरेश गबाले, दत्तात्रय मुठे, अशोक उघडे, पांडुरंग पथवे, रामदास पवार,राजेंद्र लहामगे, सुशांत वाकचौरे, साहेबराव दातखिळे, ओंकार धुमाळ, मुकेश बैरागी, नवनाथ आवारी, वाकचौरे, गणपत थिगळे, प्रदिप हासे, भाऊसाहेब वाळूंज, राम भांगरे, दीपक  शेटे, रामहारी तिकांडे,ज्ञानेश्वर पुंडे, दत्ता शेटे, कैलास तळेकर आदींचे नावे आहेत.

बीड शहरात मूलभूत सुविधा देण्यासाठी 15 व्या वित्त आयोगाचा निधी खर्च व्हावा; डॉ. योगेश क्षीरसागर यांच्यासह शिष्टमंडळाची जिल्हाधिकार्‍यांकडे मागणी
नीट फेरपरीक्षेची प्रश्नपत्रिका काठिण्यपूर्ण; भौतिकशास्त्रातील प्रश्नांनी विद्यार्थ्यांची कसोटी, कट ऑफ घसरण्याची शक्यता
शोल्डर- मलबार हिल शाखा अंतर्गत पश्‍चिम उपविभागातमेन – शासकीय बंगल्यांच्या कामांमध्ये कोट्यावधींचा घोटाळा; सार्वजनिक बांधकाम विभागातील शासकीय निधीची लूट; अधिकार्‍यांची संगनमताने मिलीभगत : डॉ. अशोक सोनवणे

अकोले: अकोले आदिवासी भागामध्ये पावसाळ्यात खरिपाच्या हंगामात आवश्यक रासायनिक खतांचा तुटवडा निर्माण झाला आहे. ही व्यावसायिकांनी रासायनिक खतांची निर्माण केलेली कृत्रिम टंचाई आहे. याचा परिणाम सर्व सामान्य शेतऱ्यांना यूरिया खताची एकही गोणी मिळू शकत नाही. यामुळे अनेक आदिवासी शेतकरी खतांपासून वंचित आहेत. तातडीने शेतकऱ्यांना युरिया खत उपलब्ध करून द्यावित व शासनाच्या ताब्यात असलेल्या युरियाचा ‘बफर स्टॉक’ तात‌डीने खुला करावा अशी मागणी ग्राहक पंचायतने केली आहे.

 याबाबत त्यांनी  तहसीलदार अकोले व तालुका कृषी अधिकारी  यांना निवेदन दिले आहे.  जुन,जुलै मध्ये झालेल्या अवकाळी व अतीवृष्टीच्या पावसाने शेतकरी राजा अगोदरच उध्वस्त झालेला आहे. तशातच तरीही अडचणीतून बी-बियाणे, पैशाची ऊसनवारी करून खरेदी करायला सुरुवात केली. भात लागवडीसाठी युरिया खताची गरज भासत आहेत खत न मिळाल्याने पेरण्यांमध्ये व भात लावणीस विलंब, उशीर होत आहे व सोयाबीन, भुईमूग, बाजरी, मका इतर, पिकासाठी शेतकऱ्यांना युरिया खताची अत्यंत गरज भासत आहे. तात्काळ युरिया खत उपलब्ध करून द्या ‘बफर स्टॉक’ तातडीने खुला करण्यात यावा असे निवेदनात म्हटले आहे.

 निवेदनावर ग्राहक पंचायतचे जिल्हा उपाध्यक्ष मच्छिंद्र मंडलीक, तालुका अध्यक्ष दत्ता शेनकर, कार्याध्यक्ष महेश नवले, सचिव राम रुद्रे, रामदास पांडे, अनंत घाणे, गंगाराम धिंदळे, मोहन मुंढे, सुरेश गबाले, दत्तात्रय मुठे, अशोक उघडे, पांडुरंग पथवे, रामदास पवार,राजेंद्र लहामगे, सुशांत वाकचौरे, साहेबराव दातखिळे, ओंकार धुमाळ, मुकेश बैरागी, नवनाथ आवारी, वाकचौरे, गणपत थिगळे, प्रदिप हासे, भाऊसाहेब वाळूंज, राम भांगरे, दीपक  शेटे, रामहारी तिकांडे,ज्ञानेश्वर पुंडे, दत्ता शेटे, कैलास तळेकर आदींचे नावे आहेत.

COMMENTS