Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पंतप्रधान मोदींचे संविधान वक्तव्य आणि वास्तव!

राजस्थान येथील प्रचारसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधी पक्षांवर टीका करताना म्हटले की, मोदी सत्तेवर आल्यास संविधान बदलले जाईल, असा विरोधी

राज्य सरकारची कोंडी
महागाईच्या जात्यात गरीब भरडतोय…
दर्ग्याच्या दर्शनानंतर पोहायला गेलेल्या 5 जणांचा तलावात बुडून मृत्यू.

राजस्थान येथील प्रचारसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधी पक्षांवर टीका करताना म्हटले की, मोदी सत्तेवर आल्यास संविधान बदलले जाईल, असा विरोधी पक्ष प्रचार करित आहेत. परंतु, संविधान हे आमच्यासाठी रामायण, महाभारत, कुराण, बायबल असल्याचे सांगत स्वतः बाबासाहेब आंबेडकर आले तरीही, ते संविधान बदलू शकत नाही, असे मोदी म्हणाले. दुसऱ्या बाजूला तामिळनाडूत राहुल गांधी यांचीही प्रचारसभा झाली. त्यातही संविधान हा विषय आला. परंतु, संविधानाचे वास्तव गेल्या पाऊनशे वर्षांत काय आहे, हे आपण पाहूया.
संपूर्ण आयुष्य देशसेवेसाठी व्यतित केलेल्या महापुरुषांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यात काहीच गैर नाही. परंतु कृतज्ञता व्यक्त करण्यालाही मर्यादा असल्या पाहिजेत. आयरीश देशभक्त डॅनियल ओकॉनेल यांनी समर्पकपणे म्हटल्याप्रमाणे, कोणताही माणूस स्वाभिमानाचा बळी देऊन कृतज्ञता व्यक्त करु शकत नाही, कोणतीही स्त्री स्वत:च्या शीलाचा बळी देऊन कृतज्ञता व्यक्त करु शकत नाही आणि कोणताही देश स्वत:च्या स्वातंत्र्याचा बळी देऊन कृतज्ञता व्यक्त करु शकत नाही. इतर देशांच्या तुलनेत भारताला सावधगिरीचा इशारा लक्षात घेणे अधिक गरजेचे आहे, कारण भारतात भक्ती किंवा जिला भक्तीचा मार्ग म्हणता येईल तो किंवा विभूतीपूजा ही जगातील इतर कोणत्याही राजकारणात दिसणार नाही, इतक्या मोठ्या प्रमाणात भारतीय राजकारणात दिसते. धर्मातील भक्ती ही आत्म्याच्या मुक्तीचा मार्ग असू शकेल. परंतु राजकारणात भक्ती किंवा व्यक्तिपूजा ही अध:पतन आणि अंतिमत: हुकूमशाहीकडे नेणारा हमखास मार्ग ठरतो. हे विचार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २५ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान सभेत शेवटचे भाषण देताना मांडले होते. भारताने २६ नोव्हेंबर १९४९ रोजी स्विकारले. पाऊनशे वर्षात भारताने सर्व प्रकारचे चढ‌उतार पाहिले. केंद्रीय सत्तेसह अनेक राज्यांच्या सत्ता काॅंग्रेस च्या रूपाने एकपक्षीय राहीली. सुरूवातीला, ज्या राज्यांनी काॅंग्रेसेतर निवडून दिले, त्या सरकारांना बरखास्त कसे केले जाईल, याची संधी काॅंग्रेस पाहत असे. मध्यंतरीच्या काळात काॅंग्रेस ने म्हणजे इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लावली आणि देशाला एकाधिकारशाहीच्या जोखडाखाली आणले. पावणेदोन वर्षाचा तो हुकूमशाहीचा काळ देशाने अनुभवला. अनेक दिग्गज नेते, विचारवंत, स्वतंत्र प्रतिभा आणि अस्मिता असलेल्या व्यक्तीमत्वांना तुरुंगात डांबले गेले होते. पण, त्याही काळात नवी पहाट झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या संविधान सभेतील अखेरच्या भाषणात सांगितलेले धोके वास्तवातही आले. परंतु, भारतीय लोकांनी आपल्यात लोकशाही मूल्य रूजलेली असल्याचा प्रत्यय वारंवार दिला. तेवढ्याच वयाची पिढी अजूनही भारताच्या सार्वजनिक जीवनात कार्यरत आहे. या पिढीने भारताच्या सुरूवातीच्या सनातन अवस्थेला जसं पाहीले तसे आणीबाणी नंतर सार्वजनिक झालेल्या बॅंक व्यवस्थेमध्ये प्रतिनिधीत्वाचा अधिकार मिळून समतेच्या दिशेने जाणारी व्यवस्थाही पाहीली. एक देश म्हणून निर्णायक वेळी भारतीयांचे विचार कसे समान होतात याची पडताळणी भारतात अनेक वेळा आली. भारतीय संविधानाने दिलेले अधिकार अथवा मूल्य धोक्यात आली तर कोणताही आक्रस्ताळेपणा न करता मतदानात शांतपणे व्यक्त होऊन, भारतीय माणूस बदल घडवून आणतो. राजकारणात असणारी माणसे संविधानाच्या बाबतीत बोलतात खूप; पण, करतात कमी. सामान्य माणसे संविधानाच्या विषयावर बोलतात कमी पण निर्णायक वेळी कृती करण्यात अग्रेसर असतात. भारतीय संविधानची मूल्य स्वातंत्र्य समता, बंधुता असून या मूल्यांच्या आधारावर भारतीय माणसे जीवन व्यतीत करतात. या दरम्यान भूमिकांचा अतिरेक करणारी पिढीही थोडाफार व्यक्त होण्याचा प्रयत्न करते, परंतु, ते तात्कालिक असते. चिरंतन राहतात ती भारतीय संविधानाची मूल्य! गेल्या काही दिवसांपासून तणाव झेलणारे भारतीय संविधान आणखी कसोटीच्या क्षणांतून जात आहे. परंतु, कोणतीही स्थिती अनित्य असते. अनित्यता हेच नित्य आहे. भारतीय समाज आता बहुभाषिक, सांस्कृतिक असला तरी तो सामाजिक, राजकीय आणि आर्थिक पातळीवर मात्र संविधानवादी आहे.

COMMENTS