Homeताज्या बातम्या

पुणे-नाशिक महामार्गावर वाकीजवळ भीषण अपघात; कंटेनर डिव्हायडर तोडून ट्रकला धडकला, कार दाबली, सुदैवाने जीवितहानी टळली!

पुणे: पुणे-नाशिक महामार्गावर खेड तालुक्यातील वाकीजवळ आज सकाळी ६:१५ च्या सुमारास भीषण अपघात घडला. नाशिककडून आलेल्या एका कंटेनरने डिव्हायडर तोडून व

१ ऑगस्टपासून बदलणार ‘हे’ महत्त्वाचे नियम; एलपीजी दरांपासून ते आयटीआर अन् रेल्वे तिकिटांपर्यंत तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम!
घरफोडी करत सात लाखांचा ऐवज लंपास; नेवासा तालुक्यातील माका येथील आखाडे वस्तीवरील धक्कादायक घटना
तृतीयपंथीयांच्या दोन टोळक्यांत तुंबळ हाणामारी; कल्याण रेल्वे स्टेशन परिसरातील घटना, व्हिडिओ व्हायरल
Pune Nashik Highway Accident: भीषण अपघात! भरधाव कंटेनर डिव्हायडर तोडून  विरुद्ध दिशेच्या ट्रकला धडकला; पुण्याकडे येणारी वाहतूक ठप्प; पुणे-नाशिक ...

पुणे: पुणे-नाशिक महामार्गावर खेड तालुक्यातील वाकीजवळ आज सकाळी ६:१५ च्या सुमारास भीषण अपघात घडला. नाशिककडून आलेल्या एका कंटेनरने डिव्हायडर तोडून विरुद्ध दिशेला जात पुण्याच्या दिशेने येणाऱ्या ट्रकला जोरदार धडक दिली. या धडकेमुळे ट्रक खाली कोसळला आणि त्याखाली एक कार दबली गेली. अपघातात दोन्ही गाड्यांचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे.

दरम्यान, अपघातामुळे कंटेनर पुणे लेनवर आल्याने पुण्याकडे येणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे, तर नाशिककडे जाणारी वाहतूकही विस्कळीत झाली आहे. घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस क्रेन घेऊन घटनास्थळी दाखल झाले असून अपघातग्रस्त वाहने बाजूला काढण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. एवढा भीषण अपघात होऊनही सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. या अपघातामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

COMMENTS