Homeताज्या बातम्या

अहंकाराचा त्याग करून विठ्ठलभक्तीत लीन व्हा : हभप चेडे; शेवगाव येथील दध्नेश्वर शिवालयात विशेष हरिकीर्तन महोत्सव संपन्न

शेवगाव: अहंकाराचा त्याग करून साधेपणाने पंढरीरायाच्या चरणी लीन व्हावे. वारकरी होणे म्हणजे केवळ पायी वारी करणे नव्हे, तर विठ्ठलभक्तीत पूर्णपणे समर्

वेताळबाबा स्टेडियमच्या माध्यमातून निघोजकरांना ऊर्जा : कवाद
अशांतता निर्माण करणारे गुन्हेगार व चिथावणीखोरांवर कडक कारवाई करा 
सायबर गुन्ह्यांपासून वाचण्यासाठी जनजागृती आवश्यक ः अ‍ॅड. शिंदे
राष्ट्रधर्म कीर्तन महोत्सवाला आजपासून प्रारंभ Nagpur Marathi News | Starts  Nationalism Kirtan Mahotsav from today | Latest Nagpur News at Lokmat.com

शेवगाव: अहंकाराचा त्याग करून साधेपणाने पंढरीरायाच्या चरणी लीन व्हावे. वारकरी होणे म्हणजे केवळ पायी वारी करणे नव्हे, तर विठ्ठलभक्तीत पूर्णपणे समर्पित होणे होय, असे प्रतिपादन संतसेवक ह.भ.प. सिताराम महाराज चेडे यांनी केले. शेवगाव तालुक्यातील प्रसिद्ध दध्नेश्वर शिवालय येथे निर्जला एकादशीनिमित्त आयोजित विशेष हरिकीर्तन महोत्सवात ते बोलत होते. यावेळी त्यांनी जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या ‘होय होय वारकरी…’ या अभंगावर सखोल निरूपण करत उपस्थितांना भक्तीमार्गाचे महत्त्व पटवून दिले.

चेडे महाराज पुढे म्हणाले की, ईश्वरप्राप्तीसाठी बाह्य कर्मकांडापेक्षा निर्मळ आणि निष्कलंक मनाची आवश्यकता असते. एकदा विठ्ठलाच्या चरणी संपूर्ण श्रद्धेने शरण गेल्यानंतर इतर कोणत्याही साधनांची गरज भासत नाही. पंढरीची वारी आणि विठ्ठलाचे दर्शन माणसाच्या अंतःकरणाची शुद्धी करून मनातील विकार दूर करते आणि परमानंदाची अनुभूती देते.

हा भक्तिमय सोहळा दध्नेश्वर शिवालयाचे संस्थापक वैकुंठवासी कृष्णदेव महाराज काळे यांच्या कृपाशीर्वादाने तसेच मठाधिपती ह.भ.प. सुदामदेव महाराज शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. यावेळी गायनाचार्य अशोक महाराज पारठे, मृदंगाचार्य ओंकार महाराज काशीद, वैभव महाराज खंबरे, रामनाथ काशीद, विठ्ठल महाराज खाडे, माजी सरपंच सुभाष पवार, अरुण घोडके, प्रमोद थोरात, माऊली काळे, दादा गर्जे यांच्यासह पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कीर्तनाची सांगता झाल्यानंतर ‘दध्नेश्वर शिवालय पंढरपूर दिंडी सोहळा’च्या सर्व चोपदारांच्या वतीने उपस्थित भाविकांना महाप्रसाद म्हणून खिचडीचे वाटप करण्यात आले. यावेळी संपूर्ण परिसर विठ्ठलनामाच्या अखंड जयघोषाने तसेच टाळ-मृदंगाच्या निनादाने भक्तिमय वातावरणाने भारावून गेला होता.

COMMENTS