Homeताज्या बातम्याअहमदनगर

‘साईकृपा’च्या कृषिकन्यांचे लिंपणगावात स्वागत

श्रीगोंदा : महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत साईकृपा कृषी महाविद्यालय येथील बी.एस्सी. (कृषी) शाखेच्या ‘रावे’ उपक्रमांतर्गत कृषिकन्यांचा लिंपणगाव येथे ग्रामसंलग्नता परिचय कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी कृषिकन्यांनी ‘रावे’ कार्यक्रमाचा उद्देश, गावात राबविण्यात येणारे उपक्रम आणि शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या आधुनिक कृषी तंत्रज्ञानाची माहिती दिली.कृषिकन्यांनी सांगितले की, लिंपणगावातील शेतकऱ्यांना नवीन कृषी तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित शेती माहिती तसेच आधुनिक शेती पद्धतींबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. यामध्ये कृषी मेळावा, पाककला स्पर्धा, तसेच कृषी विषयांवरील दहा विविध प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात येणार आहे. या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना अद्ययावत कृषी ज्ञान मिळून उत्पादनवाढीस मदत होईल, असा विश्वास कृषिकन्यांनी व्यक्त केला. यावेळी सहाय्यक प्राध्यापक व कार्यक्रम समन्वयक श्री. एस. एस. चव्हाण यांनी गावामध्ये कृषी जनजागृती व विविध प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे सांगितले. या कार्यक्रमासाठी श्री दत्तकृपा शैक्षणिक व कृषि ग्रामविकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष दत्तात्रय पानसरे, सचिव अर्चना पानसरे, रजिस्ट्रार कल्याण शिंदे, प्राचार्य डॉ. के. एच. निंबाळकर, कार्यक्रम अधिकारी एस. एस. बंडगर यांचे मार्गदर्शन लाभले.कार्यक्रमास ग्रामविकास अधिकारी धायगुडे, प्रवीण कुरुमकर,  पाटील, प्रदीप कोकाटे, संग्राम ओहोळ, जालिंदर कुरुमकर, सर्जेराव चव्हाण, अवधूत भोईटे, सिद्धार्थ ओहोळ, शिवाजी कुसाळकर, खासेराव पवार यांच्यासह ग्रामस्थ व शेतकरी उपस्थित होते.साईकृपा कृषी महाविद्यालयाच्या कृषिकन्या श्रावणी मसाळ, शांभवी कुलथे, शुक्रांजली रांधवे, काजल जाधव, पायल येडे, मृणाली थोरात व अहिल्या वाघमोडे यांनी कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेतला.

केज येथे सत्यमेव जयते फार्मर कप आणि उमेद अंतर्गत आयोजित गटबांधणी कार्यशाळा
नांदुर गावामध्ये कृषीदुतांचे आगमन
राडी येथे खेती बचाव अभियानाचा शुभारंभ; शेतकर्‍यांना आधुनिक शेती तंत्रज्ञानाचे मार्गदर्शन

COMMENTS