Homeताज्या बातम्या

हिवरसिगा येथे शेतकर्‍यांना केंद्र शासनाच्या योजनेअंतर्गत कपाशी बियाण्यांचे वाटप

शिरूर कासार तालुक्यातील मौजे हिवरसिगा येथे केंद्र शासनाच्या कापूस उत्पादकता वाढ अभियान (एमसीपी) योजनेअंतर्गत कपाशी उत्पादक शेतकरी गटातील लाभार्थ्

‘साईकृपा’च्या कृषिकन्यांचे लिंपणगावात स्वागत
नांदुर गावामध्ये कृषीदुतांचे आगमन
महाडीबीटी पोर्टलवर खरीप बियाण्यांचे वितरणशेतकर्‍यांनी लाभ घेण्याचे कृषीमंत्री भरणे यांचे आवाहन



शिरूर कासार तालुक्यातील मौजे हिवरसिगा येथे केंद्र शासनाच्या कापूस उत्पादकता वाढ अभियान (एमसीपी) योजनेअंतर्गत कपाशी उत्पादक शेतकरी गटातील लाभार्थ्यांना कपाशी बियाण्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी सघन कापूस लागवड पद्धती, उत्पादनवाढ आणि आधुनिक तंत्रज्ञानाविषयी शेतकर्‍यांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
हा कार्यक्रम जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुभाष साळवे आणि तालुका कृषी अधिकारी अमृत गांगर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. यावेळी उपकृषी अधिकारी संजय फरतडे, कृषी सहाय्यक संदीपान जाधव तसेच कृषी विभागाचे अधिकारी संतोष घाशिंग उपस्थित होते. कार्यक्रमात सघन (क्लोजर) लागवड पद्धतीचा अवलंब करून रोपांची घनता वाढविणे, योग्य वाणांची निवड, वाढ व्यवस्थापन, संतुलित अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि उत्पादनवाढीसाठी आवश्यक आधुनिक तंत्रज्ञान याविषयी धनश्री, शिवक्रांती आणि शिवज्योती शेतकरी गटातील सदस्यांना सखोल माहिती देण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुधाकर राऊत होते, तर प्रमुख अतिथी म्हणून उपसरपंच विश्वाभर शिंदे उपस्थित होते. यावेळी शेतकरी गटांचे अध्यक्ष ज्ञानोबा शिंदे, शिवराम राऊत, प्रभाकर डोगरे, अहमद शेख, सतीश दुधाळ, राजेंद्र दुधाळ, प्रल्हाद दुधाळ तसेच ग्रामपंचायत सदस्य आणि तंटामुक्त समितीचे भीमराव सानप उपस्थित होते. हिवरसिगा हे कपाशी उत्पादनासाठी ओळखले जाणारे गाव असल्याने या मार्गदर्शन कार्यक्रमाला शेतकर्‍यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमाचे आयोजन श्रीनिवास सार्वजनिक वाचनालय, हिवरसिगा येथील प्रशस्त सभागृहात करण्यात आले होते. वाचनालयाच्या माध्यमातून शेतकरी बांधवांसाठी करण्यात आलेल्या सुविधांबद्दल कृषी विभागाच्या अधिकार्‍यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी धर्मराज शिंदे, प्रभाकर सानप, श्रीराम भालेराव, श्रीधर सानप, नवनाथ बडे, गोवर्धन गरत, अशोक देवकर, नारायण दुधाळ, वैजिनाथ सानप, सावता दुधाळ, दिलीप दुधाळ, सिद्धेश्वर दुधाळ, महादेव देवकर, रामेश्वर पाडुळे, शाम दुधाळ, कृष्णा शिंदे, प्रदीप बोराडे, विष्णू सानप, जालिंदर राऊत, अगद शिंदे, कमरुद्दीन शेख, भीमराव तिकाडे, खाजाभाई शेख, अलीम शेख, कैलास दुधाळ, अनिल शिंदे, गणेश गवळी, शिवनारायण दुधाळ, श्रीनिवास राऊत, आश्रुबा शेळके, सतीश कुटे, आसाराम शिंदे, अमोल शिंदे, बाळू सालपे, अकुश गवळी, महेश शिंदे, अतुल शिंदे यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी, पदाधिकारी आणि लाभार्थी उपस्थित होते

COMMENTS