Homeताज्या बातम्याबीड

परळी नगरपरिषदेविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे आक्रमक ढोल बजाव आंदोलनढोल-ताशांच्या गजराने नगरपरिषद परिसर दणाणला; भ्रष्टाचाराच्या चौकशीची जोरदार मागणी

परळी नगरपरिषदेच्या कथित ढिसाळ, मनमानी व जनविरोधी कारभाराविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट) आक्रमक झाली असून आज शहरात जोरदार ढ

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना स्थगिती; राज्य निवडणूक आयोगाचा महत्वपूर्ण निर्णय
टिटवी येथे बंजारा परंपरेतील तीज सण उत्साहात 
शेतकर्‍यांनी शांततेत वहीवाट काढून द्यावी



परळी नगरपरिषदेच्या कथित ढिसाळ, मनमानी व जनविरोधी कारभाराविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट) आक्रमक झाली असून आज शहरात जोरदार ढोल बजाव आंदोलन छेडण्यात आले. ढोल-ताशांच्या गजरात झालेल्या या आंदोलनामुळे नगरपरिषद परिसर अक्षरशः दणाणून गेला होता.
जनतेच्या पैशांचा हिशोब द्या, विकासकामांची चौकशी करा, घरकुल लाभार्थी यादी जाहीर करा अशा जोरदार घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. आंदोलनात सहभागी कार्यकर्त्यांनी नगरपरिषदेच्या कारभारावर तीव्र संताप व्यक्त करत भ्रष्टाचाराच्या चौकशीची मागणी केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने प्रभाग क्रमांक 15 व नवीन 16 नांदुरवेस परिसरात सन 2016 ते 2025 दरम्यान झालेल्या विकासकामांची सविस्तर माहिती सार्वजनिक करावी, जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत मंजूर कामांची चौकशी करावी, प्रधानमंत्री आवास योजना व रमाई घरकुल योजनेतील लाभार्थ्यांची यादी जाहीर करावी, अशी प्रमुख मागणी करण्यात आली. याशिवाय नगरपरिषद कार्यालयातील फर्निचर खरेदीतील खर्चाची माहिती जाहीर करावी, पालखी मार्गावरील अंबेवेस येथे सुरू असलेल्या पुलाच्या कामाची चौकशी करण्यात यावी तसेच शहरात नमो उद्यान उभारण्यात यावे, अशा विविध मागण्या आंदोलनाद्वारे करण्यात आल्या. या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट) परळी शहराध्यक्ष महादेव गंगणे पाटील, माजी नगराध्यक्ष दीपक नाना देशमुख, जेष्ठ नेते उत्तमदादा माने, अँड. जीवन देशमुख, नगरसेवक तथा गटनेते नितीन बागवाले, नगरसेवक कादर पाशा कुरेशी, याकुब शेख, अमर रोडे, लखन मोरे, गणेश सोळंके, चंद्रकांत पटाडे, सोहेल, गुलाब पिळवटे, निलेश वाघमारे, समीर कोरे, प्रमोद चौंडे, वैजनाथ जोशी, सतीश बागवाले, दीपक जाधव, सचिन चव्हाण, कल्पेश बागवाले, श्रीकृष्ण गायकवाड, लखन गायकवाड, आकाश बागवाले, शेख जाहेद, समीर कुरेशी, राजा खान यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. आंदोलनामुळे काही काळ नगरपरिषद परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्यास यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडू, असा इशाराही आंदोलनकर्त्यांनी दिला.

COMMENTS