महसूल विभागाच्या ‘या’ बड्या अधिकाऱ्यावर अटकेची टांगती तलवार (Video)

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महसूल विभागाच्या ‘या’ बड्या अधिकाऱ्यावर अटकेची टांगती तलवार (Video)

दोन वर्षोपूर्वी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचे तत्कालीन कुलसचिव सोपान कासार यांनी माहिती अधिकार कार्यकर्ते बाळासाहेब जाधव यांच्या बद्दल जातीवाच

दादा पाटील महाविद्यालयात गुणवंत कलाकारांचा सन्मान
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या रस्ते साधन सुविधा आस्थापना विभागाच्या जिल्हा संघटकपदी दीपक परदेशी यांची नियुक्ती 
दूध भेसळ प्रकरणातील मुख्य आरोपीचा जामीन मंजूर

दोन वर्षोपूर्वी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचे तत्कालीन कुलसचिव सोपान कासार यांनी माहिती अधिकार कार्यकर्ते बाळासाहेब जाधव यांच्या बद्दल जातीवाचक आशयाचे बोलल्याबद्दल त्यांच्यावर राहुरी पोलीस ठाण्यात अँट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याच्या संदर्भात सोपान कासार यांनी अहमदनगर कोर्टात जामीन मिळण्यासाठी अर्ज केला होता. पण तो अर्ज न्यायालयाने फेटाळून लावल्याने त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार आली होती. त्यानंतर त्यांनी औरंगाबाद खंडपिठात जामीनासाठी अर्ज दाखल केला. पण कोरोनाकाळ सुरू झाल्याने त्यावर सुनावणी झाली नाही. त्या प्रकरणाची सुनावणी २७ ऑक्टोबरला झाली . त्यात तत्कालीन कुलसचिव सोपान कासार यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. सोपान कासार हे सध्या येवला नांदगाव विभागाचे प्रांताधिकारी आहेत. त्यांची कारकीर्द ही कायमच कोणत्या न कोणत्या कारणाने चर्चेत असते. येवला येथेही त्यांनी त्यांच्या विभागातील महिला कर्मचाऱ्यांकडे शरीर सुखाची मागणी केली होती. आता उच्च न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळून लावल्याने पुन्हा सोपान कासार यांच्यावर अटकेची टांगती तलवार आली आहे.

COMMENTS