Homeताज्या बातम्या

पिंपळनेर येथे पीएसआय प्रियंका परदेशी यांचा सत्कार

बीड तालुक्यातील पिंपळनेर येथील श्री व्यंकटेश इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये दि. 13 जून रोजी पिंपळनेरच्या पहिल्या महिला पोलीस उपनिरीक्षक

कौशल्याधारित शिक्षणामुळे उज्ज्वल भविष्य : आ. लहामटे  
उर्दू विषयात जिल्ह्यात प्रथम; कु. कुलसुम आरा जागीरदारचा भव्य सत्कार
यश मिळविण्यासाठी सातत्यपूर्ण परिश्रम, शिस्त व आत्मविश्वास आवश्यक – राजकिशोर मोदीश्री बालाजी शिक्षण प्रसारक मंडळाकडून इयत्ता 10 वी आणि 12 वी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव



बीड तालुक्यातील पिंपळनेर येथील श्री व्यंकटेश इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये दि. 13 जून रोजी पिंपळनेरच्या पहिल्या महिला पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय) म्हणून नियुक्ती झालेल्या प्रियंका भरतसिंग परदेशी यांचा सत्कार करण्यात आला. नाशिक येथील पोलीस प्रशिक्षण अकादमीत यशस्वीपणे प्रशिक्षण पूर्ण केल्याबद्दल त्यांचा विशेष गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. सुरेश सावंत होते. प्रमुख अतिथी म्हणून प्रियंका परदेशी यांच्या आई इंदुबाई भरतसिंग परदेशी उपस्थित होत्या. तसेच प्राचार्य अशोक कदम यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सखाराम कानतोडे यांनी केले. यावेळी पीएसआय प्रियंका परदेशी यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत आपल्या यशाचा प्रवास उलगडला. त्यांनी विद्यार्थ्यांना अभ्यासाचे महत्त्व पटवून देत संयम, सातत्य, जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रम यांच्या बळावर कोणतेही ध्येय साध्य करता येते, असे प्रेरणादायी मार्गदर्शन केले. अध्यक्षीय भाषणात प्रा. सुरेश सावंत यांनी पिंपळनेर नगरीच्या शैक्षणिक आणि गुणवत्तापूर्ण परंपरेवर प्रकाश टाकत प्रियंका परदेशी यांच्या यशाचे कौतुक केले. त्यांच्या यशामुळे गावातील विद्यार्थिनींना नवी प्रेरणा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाच्या शेवटी उपप्राचार्य तोगे यांनी उपस्थितांचे आभार मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राचार्य अशोक कदम, उपप्राचार्य तोगे, उदय खरात, सखाराम कानतोडे, मुकुंद आबूज, सागर कदम, कैवल्या पवार, दिव्या लोळगे, लांडे, राजश्री नरवडे, अंजली घुमरे, संभाजी जाधव, प्रदीप आमटे, गणेश राऊत, अनिरुद्ध मोरे, पवन घुमरे, तुकाराम जाधव, विकास पूर्भे आदी शिक्षक व कर्मचार्‍यांनी परिश्रम घेतले.

COMMENTS