Homeताज्या बातम्या

रोहित पवार यांच्या सरसकट कर्जमुक्ती आंदोलनाला किसान संघर्ष समितीचा सक्रिय पाठिंबा

शेतकर्‍यांना सरसकट कर्जमाफी देण्याच्या मागणीसाठी आमदार रोहित पवार यांनी पंढरपूर येथे सुरू केलेल्या ‘अन्नदात्यासाठी अन्न सत्याग्रह’ आंदोलनाला राष्

अचानक पावसाचा कांदा उत्पादकाला जबर फटका
रोहित पवार यांच्या अन्नत्याग आंदोलनाला शेतकरी हक्क मोर्चाचा पाठिंबाफसव्या कर्जमाफी जीआरची गावोगावी होळी करणार-राजेंद्र आमटे
सरसकट कर्जमाफीसाठी नगर-मनमाड महामार्गावर चक्काजाम  शिंदे शिवसेना शेतकरी सेनेचे राहुरीत आंदोलन



शेतकर्‍यांना सरसकट कर्जमाफी देण्याच्या मागणीसाठी आमदार रोहित पवार यांनी पंढरपूर येथे सुरू केलेल्या ‘अन्नदात्यासाठी अन्न सत्याग्रह’ आंदोलनाला राष्ट्रीय किसान संघर्ष समितीने सक्रिय पाठिंबा जाहीर केला आहे. समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. सुनीलम आणि राष्ट्रीय उपाध्यक्षा प्रा. सुशीलाताई मोराळे यांनी उपोषणस्थळी भेट देत आंदोलनाला समर्थन दर्शविले.
दि. 12 जूनपासून सुरू असलेल्या या आंदोलनात सहभागी होताना डॉ. सुनीलम यांनी दिल्ली सीमेवर झालेल्या ऐतिहासिक शेतकरी आंदोलनाचा अनुभव उपस्थितांसमोर मांडला. शेतकरीविरोधी तीन कृषी कायदे रद्द करण्यासाठी 380 दिवस चाललेल्या आंदोलनात किसान संघर्ष समिती आणि संयुक्त किसान मोर्चाने सक्रिय भूमिका बजावली होती. देशातील सुमारे 300 शेतकरी संघटनांच्या एकत्रित लढ्यामुळे केंद्र सरकारला हे कायदे मागे घ्यावे लागले, असे त्यांनी सांगितले. यावेळी बोलताना शेतकरी नेत्यांनी राज्य सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी ही अपुरी व दिशाभूल करणारी असल्याचा आरोप केला. अर्थसंकल्पात कर्जमाफीसाठी स्पष्ट तरतूद नसल्याचे सांगत, ही घोषणा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून करण्यात आल्याची टीका त्यांनी केली. सरकारच्या माहितीनुसार, या योजनेमुळे राज्यावर सुमारे 36 हजार 588 कोटी रुपयांचा अतिरिक्त आर्थिक भार पडणार असून 56 लाख शेतकर्‍यांना लाभ मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र प्रत्यक्षात दोन लाख रुपयांपर्यंतचेच कर्ज माफ होणार असून सुमारे 16.74 लाख शेतकरी या योजनेच्या कक्षेत येणार आहेत. दोन लाखांपेक्षा अधिक कर्ज असलेल्या शेतकर्‍यांना उर्वरित रक्कम 31 मार्च 2027 पर्यंत भरण्याची अट घालण्यात आली आहे. अशा सुमारे 2.10 लाख शेतकर्‍यांना 50 हजार रुपयांचे प्रोत्साहन अनुदान देण्याची तरतूद असल्याचेही सांगण्यात आले. तसेच 2019 मधील कर्जमाफीचा लाभ घेतलेल्या शेतकर्‍यांना नव्या कर्जमाफी योजनेचा लाभ मिळणार नसल्यामुळे मोठा शेतकरी वर्ग वंचित राहणार असल्याचे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे. दुष्काळ, अतिवृष्टी, अवकाळी पाऊस, हमीभावाचा अभाव, निर्यात-आयात धोरणातील बदल आणि नापिकी यांसारख्या संकटांमुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडत असल्याचे नमूद करत, अटी-शर्तींसह जाहीर करण्यात आलेली कर्जमाफी स्वीकारार्ह नसल्याने रोहित पवार यांनी प्राणांतिक उपोषण सुरू केले असल्याचे किसान संघर्ष समितीच्या पदाधिकार्‍यांनी सांगितले. यावेळी राष्ट्रीय किसान संघर्ष समितीच्या वतीने डॉ. सुनीलम आणि प्रा. सुशीलाताई मोराळे यांनी आंदोलनाला संपूर्ण पाठिंबा देत शेतकर्‍यांच्या न्याय्य मागण्यांसाठी संघर्ष सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला.

COMMENTS