Homeताज्या बातम्या

व्हॉईस ऑफ मीडियाच्या राज्य कोषाध्यक्षपदी गायत्री ढवळे

श्रीगोंदा: महिला पत्रकार गायत्री ढवळे यांची 'व्हॉईस ऑफ मीडिया' या आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटनेच्या महाराष्ट्र राज्य कार्यकारी समितीच्या राज्य कोष

अनैतिक संबंधाच्या संशयातून तरुणाचा गळा दाबून खून; पत्नीच्या मदतीने मृतदेह पोत्यात भरून फेकला, पती-पत्नीला अटक
श्रीमती मीना नरपडवार यांचा सेवापूर्ती सोहळा अक्षरांच्या गाभार्‍यात स्नेहाची उधळण करत संपन्न
बीड जिल्हा रोल बॉल स्पर्धा व संघ निवड चाचणी 9 ऑगस्ट रोजी

श्रीगोंदा: महिला पत्रकार गायत्री ढवळे यांची ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ या आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटनेच्या महाराष्ट्र राज्य कार्यकारी समितीच्या राज्य कोषाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे आणि राज्य अध्यक्ष अनिल मार्के यांनी त्यांच्या नियुक्तीची घोषणा केली. पत्रकारितेतील त्यांचे सातत्यपूर्ण योगदान, संघटनेप्रती असलेली निष्ठा आणि पत्रकारांच्या हितासाठी केलेल्या कार्याची दखल घेऊन त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. गायत्री ढवळे यांनी संघटनेच्या विविध कार्यक्रमांमध्ये सक्रिय भूमिका बजावली असून महिला पत्रकार आणि पत्रकारितेच्या हिताशी संबंधित मुद्दे प्रभावीपणे मांडले. त्यांच्या योगदानाची दखल घेऊन त्यांना राज्य पातळीवर काम करण्याची संधी देण्यात आली आहे. त्यांच्या निवडीबद्दल सर्व स्तरातुन कौतुक व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

COMMENTS