राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना घेतले ताब्यात

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना घेतले ताब्यात

सोनियांच्या ईडी चौकशी विरोधात केले आंदोलन

नवी दिल्ली : 'मनी लाँड्रिंग' प्रकरणी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची ईडी कडून चौकशी सुरू आहे. या चौकशीच्या विरोधात आंदोलन करणारे खा. राहुल गांधी

नक्षलवाद्यांकडून वाहनांची जाळपोळ |
शिर्डी येथे ‘महापशुधन एक्सपो’ चे २४ ते २६ मार्च दरम्यान आयोजन
ध्रुव ग्लोबल स्कूलची उज्ज्वल निकालाची पंरपरा कायम


नवी दिल्ली : ‘मनी लाँड्रिंग’ प्रकरणी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची ईडी कडून चौकशी सुरू आहे. या चौकशीच्या विरोधात आंदोलन करणारे खा. राहुल गांधी आणि इतर नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडी आज, मंगळवारी दुसऱ्यांदा काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची चौकशी करत आहे. सोनिया गांधींच्या या चौकशीमुळे काँग्रेसमध्ये अस्वस्थता पसरली आहे. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी देशभरात रस्त्यावर उतरून सोनियांच्या चौकशीचा निषेध नोंदवला. दरम्यान खा. राहुल गांधी दिल्लीतील विजय चौकात निदर्शने करणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये सहभागी झाले होते, त्यानंतर त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. राहुल गांधी यांना किंग्सवे कॅम्पमध्ये नेण्यात आले.राहुल गांधी यांना राष्ट्रपतींना भेटून त्यांना निवेदन द्यायचे होते, मात्र त्यांना विजय चौकाच्या पलीकडे जाऊ दिले नाही. त्यानंतर राहुल विजय चौकातच धरणे धरून बसले. या सर्व प्रकारानंतर राहुल गांधींना ताब्यात घेण्यात आले. त्याचवेळी पक्षाच्या दिग्गज नेत्यांनी संसद भवन परिसर ते विजय चौकापर्यंत मोर्चा काढला. यावेळी काँग्रेसच्या अनेक खासदारांना ताब्यात घेण्यात आले. ताब्यात घेतल्यानंतर राहुल गांधी म्हणाले की, काँग्रेसचे हे खासदार विजय चौकात आले आहेत. बेरोजगारी ते महागाई यासह इतर अनेक मुद्द्यांवर त्यांना बोलायचे होते, मात्र पोलीस त्यांना येथे बसू देत नाहीत. दुसरीकडे संसदेत चर्चा होऊ दिली जात नाही आणि इथे पोलीस आम्हाला अटक करत आहेत असा आरोप राहुल यांनी केला.

COMMENTS