Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राज्याला पुन्हा नवे राज्यपाल मिळणार ?

रमेश बैस यांची गच्छंती होण्याची शक्यता

मुंबई/प्रतिनिधी : राज्यात गेल्या काही दिवसांपासून राजकीय घडामोडींनी वेग धरला असतांनाच, राज्यात पुन्हा एकदा राज्यपाल बदलण्याच्या वार्‍यांनी जोर धर

नगर शहरासह जिल्ह्यात लॉकडाऊनची गरज ; जागरूक नागरिक मंचाने केली मुख्यमंत्र्यांकडे मागणी
एम्समध्ये गर्भस्थ शिशुच्या हृदयावर शस्त्रक्रिया
राज्यातील सत्तासंघर्ष पुन्हा सर्वोच्च न्यायालयात

मुंबई/प्रतिनिधी : राज्यात गेल्या काही दिवसांपासून राजकीय घडामोडींनी वेग धरला असतांनाच, राज्यात पुन्हा एकदा राज्यपाल बदलण्याच्या वार्‍यांनी जोर धरला आहे.  राज्यातील सर्वात वादग्रस्त ठरलेल्या भगतसिंह कोश्यारी यांची उचलबांगडी केल्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी रमेश बैस यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती केली होती. परंतु आता येत्या काही दिवसांत राष्ट्रपती त्यांचा राजीनामा घेणार असल्याची चर्चा रंगली आहे. यांसदर्भात भाजपच्या शीर्ष नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचे वृत्त आहे.
राज्यपाल रमेश बैस हे मूळ छत्तीसगड राज्यातील असून आगामी छत्तीसगड विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून त्यांना थेट निवडणुकीच्या रिंगणात उतरवले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. येत्या काही महिन्यात राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगड या तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा होणार आहे. त्यासाठी भाजपकडून तिन्ही राज्यात विजयी होण्यासाठी रणनीती आखली जात आहे. रमेश बैस हे यापूर्वी झारखंडचे राज्यपाल होते. भगतसिंह कोश्यारी यांनी राजीनामा दिल्यानंतर रमेश बैस हे महाराष्ट्राचे नवे राज्यपाल झाले. त्यांनी छत्तीसगडमधील रायपूर लोकसभा मतदारसंघाचे सातवेळा प्रतिनिधित्व केलेले आहे. शांत आणि संयमाने पक्षसंघटना संभाळत निवडणुका जिंकणारा नेता अशी त्यांची छत्तीसगडमध्ये ओळख आहे.

छत्तीसगडच्या राजकारणात परतण्याची शक्यता – छत्तीसगडमध्ये सध्या काँग्रेसचे सरकार असून तिथे भाजपकडे मुख्यमंत्रीपदासाठी प्रभावी चेहरा नाहीये. त्यामुळे छत्तीसगडच्या विधानसभा निवडणुकीची जबाबदारी रमेश बैस यांच्याकडे देण्यासाठी भाजपच्या शीर्ष नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रमेश बैस यांच्या छत्तीसगड मार्ग मोकळा केल्यास त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा घेतला जाणार आहे. त्यामुळे आता महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण असणार, याबाबतही तर्कवितर्क लावले जात आहेत.

COMMENTS