Homeताज्या बातम्यासंपादकीय

महाराष्ट्रात दुर्लक्षित, केंद्रात मजबूत ! 

महाराष्ट्रातील राजकारणात सर्वपक्षीय निवडणूकांची चर्चा सातत्याने होत असली तरी, मुळ महाराष्ट्राचे परंतु महाराष्ट्राबाहेर राजकारणात चर्चा होत असलेले

इंधन पूर्तता करार अर्थात कच्चे तेल आयात!
उचलली जीभ, लावली टाळ्याला!
ओबीसींवर अन्याय कराल, तर, परिणाम भोगाल ! 

महाराष्ट्रातील राजकारणात सर्वपक्षीय निवडणूकांची चर्चा सातत्याने होत असली तरी, मुळ महाराष्ट्राचे परंतु महाराष्ट्राबाहेर राजकारणात चर्चा होत असलेले राजकीय व्यक्तिमत्व म्हणजे विनोद तावडे. तसं पाहिलं तर, महाराष्ट्राच्या राजकारणात अतिशय आक्रमक नेतृत्व असलेले विनोद तावडे यांचं २०१९ चे विधानसभेचे तिकीट कापण्यात आलं. केवळ त्यांचच नव्हे तर त्यांच्याबरोबर एकनाथ खडसे, पंकजा मुंडे आणि चंद्रशेखर बावनकुळे या तिघांचे तिकीट कापण्यात आले. खडसे यांनी भारतीय जनता पक्ष सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पंकजा मुंडे या केंद्राच्या राजकारणात असल्या तरीही त्यांचे अस्तित्व जाणवत नाही. चंद्रशेखर बावनकुळे मात्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष बनवले गेले. जे चार नेते यांचे २०१९ मध्ये तिकीट करण्यात आलं, ते चारही नेते भारतीय जनता पक्षाचे खरे तर संघटक होते. संघटक असणार नेतृत्व हे जनतेमध्ये वावरत असल्यामुळे आक्रमकही असतं. ही आक्रमकता पक्षीय पातळीवर सामाजिक आविष्कारातही स्पष्ट होते. अशावेळी या चौघांनाही राजकारणातून जवळपास बाहेर करण्याचा प्रयत्न झाला; परंतु, दिल्लीकरांनी आणि खास करून नरेंद्र मोदी यांनी या प्रत्येकाच्या राजकारणाला बळ देण्याचा प्रयत्न केला. त्यातील पक्षाच्या बाहेर फक्त एकनाथ खडसे गेले. पंकजा मुंडे अजूनही पक्षांतर्गत संघर्ष करत आहेत. पण, बावनकुळे मात्र अध्यक्ष झाले आहेत.

अशावेळी विनोद तावडे यांना महाराष्ट्राच्या राजकारणातून त्यांना जवळपास हद्दपार केल्यानंतर केंद्रातील राजकारणात जाऊन, जो संयम बाळगला, त्याचा परिणाम त्यांना आज पक्षांतर्गत महत्त्वपूर्ण भूमिका मिळण्यात झाला. निश्चितपणे असं म्हणता येईल की संयमाचे फळ हे नेहमी गोड असते. त्यांचे राजकारण केंद्रीय पातळीवर ज्या पद्धतीने आता उभे राहिले, ते पाहता भारतीय जनता पक्षाचा महाराष्ट्रातील प्रत्येक नेता किंवा प्रत्येक व्यक्ती जी विधानसभा किंवा लोकसभा निवडणूक लढवू पाहते, त्या सगळ्यांच्या समोर आता विनोद तावडे हे एक प्रस्थ म्हणून उभे राहिले. त्यांना बळ देण्याचं काम निश्चितपणे मोदी-शहा या जोडीचनेच केले आहे. त्यामुळे त्यांच्या राजकीय अस्तित्वाची आता ठळक जाणीव महाराष्ट्रातील प्रत्येक राजकीय नेत्याला आणि विशेषतः भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना होऊ लागली आहे. लोकसभा निवडणुकीची जी १९५ उमेदवारांची पहिली यादी भारतीय जनता पक्षाने जाहीर केली. ती यादी जाहीर करण्याची भूमिका विनोद तावडे यांनीच बजावली. त्यामुळे त्यांची देशभरात चर्चा होऊ लागली आहे. मोदी-शहा यांचा हात ज्यांच्या पाठीवर पडतो, ते त्या-त्या पक्षात उंचीवर जातात. त्या उलट या चौघे नेत्यांचा राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या ज्या नेत्यांनी खच्चीकरण केलं, त्यांनाच आता या चौघांच्या राजकारणातून उत्तर मिळाले आहे. पंकजा मुंडे यांची महाराष्ट्राच्या राजकारणात फार दखल घेतली जात नसल्यामुळे अधून मधून ते आपल्या संघटन बळाच्या जोरावर राज्यातील भाजप नेत्यांना निश्चितपणे धमकावून जातात. तर विनोद तावडे हे राज्यात कोणतीही लुडबुड न करता केंद्रामध्ये आपलं स्थान अधिकाधिक मजबूत करता येईल या दिशेने प्रयत्न राहत आहेत. वर्तमान काळात त्यांना मिळालेली भूमिका हे निश्चितपणे महाराष्ट्राच्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांसाठी एक सबक ठरेल किंवा एक निश्चितपणे प्रेरणा ठरेल, असं म्हणण्यास हरकत नाहीं.

COMMENTS