Homeताज्या बातम्या

संतोष पेढेकर यांची भारतीय सैन्यात निवड

अकोले : तालुक्यातील नाशिक जिल्ह्याच्या सरहद्दीवरील बिताका येथील संतोष नवनाथ पेढेकर यांची भारतीय सैन्याच्या मराठा लाइट इन्फंट्री दलात निवड झाली आह

राजकीय हस्तक्षेपामुळे संगमनेरचा रेल्वे मार्ग बदललामाजी मंत्री थोरात ; वाढत्या हप्तेखोरी व टक्केवारीबाबत चिंता व्यक्त
कर्जत तालुक्यातील राशीनमध्ये वादळी वाऱ्यामुळे अनधिकृत होर्डिंग कोसळून २४ वर्षीय तरुणाचा जागीच दुर्दैवी मृत्यू; दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
जामखेडमधील भेसळखोरांवर कारवाई करावीजन जागरण युवा मंचची आयुक्त मुंढे यांच्याकडे मागणी


अकोले : तालुक्यातील नाशिक जिल्ह्याच्या सरहद्दीवरील बिताका येथील संतोष नवनाथ पेढेकर यांची भारतीय सैन्याच्या मराठा लाइट इन्फंट्री दलात निवड झाली आहे. कर्नाटकातील बेळगाव येथे त्यांची नियुक्ती झाल्याने गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
संतोष पेढेकर यांच्या निवडीचा आनंद व्यक्त करण्यासाठी एकदरे येथील सरनाईक मोखाजी बाबा मंदिरापासून बिताका गावापर्यंत मिरवणूक काढण्यात आली. यावेळी संदेश रोकडे यांच्या हस्ते शाल व पुष्प देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी बोलताना ज्येष्ठ नागरिक लक्ष्मण पेढेकर यांनी गावाच्या ऐतिहासिक परंपरेचा उल्लेख करत गावातील युवकांनी एकजुटीने प्रगतीचा मार्ग स्वीकारावा, असे आवाहन केले. वनिता पेढेकर यांनी संतोष यांच्या संघर्षमय प्रवासावर प्रकाश टाकला. शेतकरी कुटुंबातील संतोष लहानपणी गुरे चारण्यासाठी व शेळ्या राखण्यासाठी डोंगर-दऱ्यांत फिरत असे. दुर्गम भागात राहून त्याने बारावीपर्यंतचे शिक्षण केळी रुम्हणवाडी येथील शासकीय आश्रमशाळेत पूर्ण केले.
 भारतीय सैन्यात भरती होण्याचे ध्येय डोळ्यांसमोर ठेवून त्याने सैन्य व पोलिस भरती प्रशिक्षण घेतले. त्यानंतर संगमनेर येथील प्रशिक्षण संस्थेत प्रवेश घेऊन कठोर परिश्रम, जिद्द आणि सातत्याच्या बळावर त्याने आपले स्वप्न साकार केले. आदिवासी व दुर्गम भागातील छोट्याशा बिताका गावाचे नाव देशपातळीवर पोहोचविल्याबद्दल ग्रामस्थांनी त्यांचे कौतुक केले.
कार्यक्रमास संतोष पेढेकर यांचे कुटुंबीय, ग्रामस्थ, युवक, महिला तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन राघू पेढेकर यांनी केले, तर प्रकाश पेढेकर यांनी आभार मानले.

COMMENTS