Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अरणगाव शाळेत पहिलीचा प्रवेशोत्सव उत्साहात

 अहिल्यानगर : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, अरणगाव येथे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ चा ‘प्रवेशोत्सव’ तसेच २०२५-२६ च्या इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांचा ‘न

नागवडे कारखान्याच्या संचालकपदी आळेकर
राष्ट्रीय बेसबॉल स्पर्धेत विराज धोंडेला कांस्यसमर्थ दुसुंगेचाही उल्लेखनीय सहभाग; ‘काकडे’ विद्यालयाचे यश
अशोक खरातचा काळा पैसा परदेशात? दुबईपर्यंत पोहोचले धागेदोरे; बड्या मंडळींचा हात असल्याची चर्चा

 अहिल्यानगर : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, अरणगाव येथे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ चा ‘प्रवेशोत्सव’ तसेच २०२५-२६ च्या इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांचा ‘निरोप समारंभ’ सोमवारी उत्साहात व भावनिक वातावरणात पार पडला.

कार्यक्रमाची सुरुवात सकाळी आठ वाजता अरणगाव केंद्राचे केंद्रप्रमुख उधार महादू यांच्या हस्ते नवागत विद्यार्थ्यांना फुगे देऊन करण्यात आली. यावेळी इयत्ता पहिलीमध्ये प्रवेश घेतलेल्या २७ चिमुकल्यांचे स्वागत करण्यात आले. मुख्याध्यापिका लहाकर यांनी, “विद्यार्थ्यांना शाळेची ओढ निर्माण व्हावी यासाठी हा मेळावा आयोजित करण्यात आला असून, मागील वर्षापासून पहिलीपासून सीबीएसई पॅटर्न सुरू करण्यात आला आहे,” असे सांगितले. 

यानंतर सकाळी नऊ वाजता इयत्ता चौथीच्या ४८ विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका होत्या. त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना, “शिक्षणात कधीही खंड आणू नका. येथे तुमचा पाया भक्कम झाला असून पुढील आयुष्यात मोठी उंची गाठण्यासाठी कठोर परिश्रम करा,” असा सल्ला दिला.

सूत्रसंचालन  महेश धामणे यांनी केले. विद्यार्थी हिंदवी, सम्राट, चिरंजीव, श्रेया, संस्कृती व प्रणव यांनी शाळेतील गोड आठवणींना उजाळा देत मनोगत व्यक्त केले. शिक्षिका अलका दळवी यांनीही मनोगत मांडले.

कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांना भेळ तसेच संस्कार व संस्कृती यांच्या वाढदिवसानिमित्त जिलेबीचे वाटप करण्यात आले. शाळेचा परिसर स्वागत फलक, रांगोळी व फुग्यांनी सजविण्यात आला होता. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्याच्या शुभेच्छांसह कार्यक्रमाची सांगता झाली. 

COMMENTS