Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

गावाच्या विकासासाठी धार्मिक ऐक्य महत्त्वाचे : आ. काशीनाथ दाते

अहिल्यानगर : नेप्ती (ता. नगर) येथे मुस्लिम समाजाची रमजान ईद (ईद-उल-फित्र) उत्साहात साजरी करण्यात आली. गावातील मुस्लिम बांधवांच्या वतीने ईद मिलन क

एसटीच्या उत्पन्नवाढीसाठी ‘पंचसूत्री’ : परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
शेतकरी संघटना विधानभवनावर धडकली ; कांद्याचे 20 टक्के निर्यात शुल्क हटवा
माहूरच्या रेणुकामातेला आम्रफळांची मनमोहक आरास

अहिल्यानगर : नेप्ती (ता. नगर) येथे मुस्लिम समाजाची रमजान ईद (ईद-उल-फित्र) उत्साहात साजरी करण्यात आली. गावातील मुस्लिम बांधवांच्या वतीने ईद मिलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात सर्व हिंदू समाजबांधवांनी सहभागी होवून मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. या ईद मिलन कार्यक्रमास आमदार काशीनाथ दाते यांनी देखील भेट देऊन ईदच्या शुभेच्छा दिल्या.
सकाळी शाही मस्जिदच्या मैदानावर मुस्लिम बांधवांनी रमजान ईदची सामुदायिक नमाज अदा केली. मौलाना मुनीर सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली नमाज पठण करून देशामध्ये शांतता, सुख, समृद्धी व धार्मिक एकात्मतेसाठी प्रार्थना करण्यात आली. संध्याकाळी गावात ईद मिलनच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात सर्व हिंदू-मुस्लिम बांधवांनी एकत्र येऊन धार्मिक एकात्मतेचे दर्शन घडविले. यावेळी सर्व समाजातील बांधवांनी शीरखुर्माचा आस्वाद घेतला. रविवारी झालेला गुढी पाडवा व सोमवारी झालेल्या ईदचा उत्साह गावात दिसून आला. उपस्थितांनी एकमेकांना भेटून ईदच्या व पाडव्याच्या शुभेच्छा दिल्या.
आमदार काशीनाथ दाते म्हणाले की, गावा-गावातील धार्मिक एकात्मता भारतीय संस्कृतीने जोडली गेलेली आहे. सर्व हिंदू-मुस्लिम बांधव रमजान ईद असो किंवा दिवाळी एकमेकांच्या सण-उत्सवात सहभागी होत असतात. गावाच्या विकासासाठी धार्मिक ऐक्य महत्त्वाचे आहे. नेप्तीत ईद मिलनच्या कार्यक्रमातून धार्मिक एकात्मतेचा संदेश दिशादर्शक असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी उद्योजक दिलीप दाते, बापूसाहेब सोनवणे, माजी उपसरपंच फारुख सय्यद, माजी जिल्हा परिषद सदस्य अरुण होळकर, माजी सरपंच दिलीप होळकर, दादू चौगुले, रामदास फुले, प्रा. एकनाथ होले, अंबादास पुंड, अशोक जपकर, मुनीर सय्यद, गुलाब सय्यद, जमीर सय्यद, जावेद सय्यद, सलीम सय्यद, बाबूलाल सय्यद, आयुब सय्यद, वाजिद सय्यद, उमर सय्यद, सिकंदर शेख, नौशाद शेख, आसिफ सय्यद, हुसेन सय्यद, मुक्तार सय्यद, रमीज सय्यद, परवेज सय्यद, अरबाज सय्यद, नवेद सय्यद, इम्रान सय्यद, रफिक सय्यद, संतोष चहाळ, सोन्याबापू कानडे, रौफ सय्यद, समीर सय्यद, युनूस सय्यद, वसिम सय्यद, कय्यूम सय्यद आदी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नाले हैदर यंग पार्टी व दोस्ती तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

COMMENTS