Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

तपोवन रोडवर भरधाव डंपरने वयोवृद्ध महिलेला चिरडले; अपघातात जागीच मृत्यू

अहिल्यानगर : अहिल्यानगरच्या तपोवन रोडवर आज सकाळी एक भीषण अपघाताची घटना घडली आहे. एका भरधाव डंपरने रस्ता ओलांडणाऱ्या वयोवृद्ध महिलेला चिरडल्याने,

नवविवाहीत दाम्पत्यासह चौघांचा मृत्यू
छत्तीसगडमधील बालोद येथे कारने चिरडल्याने तीन मित्रांचा मृत्यू
आजरा येथे भिंत कोसळून प्राध्यापिका व विद्यार्थिनीचा मृत्यू

अहिल्यानगर : अहिल्यानगरच्या तपोवन रोडवर आज सकाळी एक भीषण अपघाताची घटना घडली आहे. एका भरधाव डंपरने रस्ता ओलांडणाऱ्या वयोवृद्ध महिलेला चिरडल्याने, या महिलेचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.
सकाळी १० च्या सुमारास तपोवन रोडवरील इंद्रायणी लॉन्स समोर हा थरार घडला. शेंडी येथील ही महिला रिक्षातून उतरून नगर-छत्रपती संभाजीनगर हायवे क्रॉस करत होती. त्याचवेळी समोरून येणाऱ्या एका भरधाव डंपरने तिला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, ही महिला थेट डंपरच्या टायरखाली चिरडली गेली.
अपघातानंतर डंपर चालक डंपर बाजूला लावून घटनास्थळावरून फरार झाला आहे. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलवला. सध्या पोलीस फरार चालकाचा शोध घेत असून पुढील तपास सुरू आहे.
या भीषण अपघातानंतर स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. तपोवन रोडवर गतिरोधक नसल्याने वाहने भरधाव वेगाने धावतात, ज्यामुळे नागरिकांना जीव मुठीत धरून रस्ता ओलांडावा लागतो. प्रशासनाने येथे तातडीने स्पीड ब्रेकर्स लावावेत, जेणेकरून वेगावर मर्यादा येईल आणि पुन्हा असे निष्पाप बळी जाणार नाहीत, अशी मागणी आता जोर धरत आहे.
प्रशासनाने या मागणीकडे दुर्लक्ष केल्यास आणखी किती बळी जाणार? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.

COMMENTS