Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुणे विद्यापीठाच्या अधिष्ठातापदी डॉ. मंडलिक

अकोले : अकोले तालुक्यातील उंचखडक येथील व अगस्ति महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी डॉ. धनंजय मंडलिक यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठच्या वाणिज्य व व्यवस्थापन शाखेच्या अधिष्ठाता  पदी निवड करण्यात आली आहे. डॉ. धनंजय मंडलिक यांनी शैक्षणिक क्षेत्रातील दीर्घ अनुभव, अभ्यासू वृत्ती आणि विद्यार्थीकेंद्री दृष्टीकोन यामुळे विशेष ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या निवडीमुळे विद्यापीठाच्या वाणिज्य व व्यवस्थापन शाखेला नवी दिशा आणि बळ मिळेल, असा विश्वास शिक्षण तज्ज्ञांकडून व्यक्त केला जात आहे. त्यांनी यापूर्वी विविध शैक्षणिक व प्रशासकीय जबाबदाऱ्या यशस्-वीपणे सांभाळल्या असून संशोधन, गुणवत्ता वृद्धी आणि आधुनिक शिक्षणपद्धती यावर त्यांनी सातत्याने भर दिला आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांना अधिक गुणवत्तापूर्ण आणि रोजगाराभिमुख शिक्षण मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. या निवडीबद्दल अहिल्यानगर, नाशिक, पुणे विभागातील विविध संस्था, प्राध्यापक, विद्यार्थी व उंचखडक ग्रामस्थांनी पुढील कार्यासाठी शुभेच्छा देत अभिनंदन केले.

आरक्षण उपवर्गीकरण समितीचा अहवाल सार्वत्रिक करा : माकप
एनएमएमएस परीक्षेत कोतुळेश्वर विद्यालयाचे यश
शेवगाव पोलीस ठाण्यावर मोर्चा; ‘वंचित’ व समविचारी पक्षांकडून ‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकाचे वाचन

अकोले : अकोले तालुक्यातील उंचखडक येथील व अगस्ति महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी डॉ. धनंजय मंडलिक यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठच्या वाणिज्य व व्यवस्थापन शाखेच्या अधिष्ठाता  पदी निवड करण्यात आली आहे.

डॉ. धनंजय मंडलिक यांनी शैक्षणिक क्षेत्रातील दीर्घ अनुभव, अभ्यासू वृत्ती आणि विद्यार्थीकेंद्री दृष्टीकोन यामुळे विशेष ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या निवडीमुळे विद्यापीठाच्या वाणिज्य व व्यवस्थापन शाखेला नवी दिशा आणि बळ मिळेल, असा विश्वास शिक्षण तज्ज्ञांकडून व्यक्त केला जात आहे. त्यांनी यापूर्वी विविध शैक्षणिक व प्रशासकीय जबाबदाऱ्या यशस्-वीपणे सांभाळल्या असून संशोधन, गुणवत्ता वृद्धी आणि आधुनिक शिक्षणपद्धती यावर त्यांनी सातत्याने भर दिला आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांना अधिक गुणवत्तापूर्ण आणि रोजगाराभिमुख शिक्षण मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. या निवडीबद्दल अहिल्यानगर, नाशिक, पुणे विभागातील विविध संस्था, प्राध्यापक, विद्यार्थी व उंचखडक ग्रामस्थांनी पुढील कार्यासाठी शुभेच्छा देत अभिनंदन केले.

COMMENTS