Homeताज्या बातम्याअहमदनगर

शिंगणापुरात बिबट्याची दहशत; शेळी फस्त

कोपरगाव शहर : शिंगणापूर गावातील २८ चारी परिसरात पुन्हा एकदा बिबट्याच्या हालचाली वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मंगळवारी (दि.१२ मे) रात्री लहू गणपत संवत्सरकर यांच्या मालकीची शेळी बिबट्याने फस्त केल्याची घटना घडली. या प्रकारामुळे परिसरात बिबट्याची दहशत अधिक वाढली आहे.या परिसरात यापूर्वीही बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणात आढळून येत होता. सध्या शेतातील पिके कमी झाल्याने तसेच लपण्यासाठी जागा कमी पडत असल्याने बिबट्याने मानवी वस्तीकडे मोर्चा वळविल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे शेतकरी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.घटनेची माहिती मिळताच बुधवारी (दि.१३ मे) कोपरगाव वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत पंचांसमक्ष पंचनामा केला. यावेळी गावचे उपसरपंच शाम संवत्सरकर, प्रशांत संवत्सरकर, नवनाथ संवत्सरकर, लहू संवत्सरकर यांच्यासह परिसरातील शेतकरी उपस्थित होते. दरम्यान, घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वनविभागाने बिबट्याला पकडण्यासाठी घटनास्थळी पिंजरा लावला असून परिसरातील हालचालींवर लक्ष ठेवण्यात येत आहे.

देशव्यापी ‘औषध बंद’मध्ये कोपरगावमधील केमिस्टही सहभागी   
कोपरगाव नगरपरिषदेच्या वतीने दिव्यांग निधीचे वाटप : पहाडे
कुकडी-सीना कालव्याचे उन्हाळी आवर्तन सोडाआ. रोहित पवारांचा पाठपुरावा ;  प्रशासनाकडे मागणी

COMMENTS