Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

देशामध्ये मुंबई, पुण्यात सर्वाधिक घरांची विक्री

गृहविक्रीच्या माध्यमातून 1 लाख 10 हजार 880 कोटींची उलाढाल पुणे : कोरोनानंतर देशामध्ये घरांची विक्रमी विक्री होतांना दिसून येत आहे. त्यात पुणे

वानखेडे कुटुंबियाविषयी वक्तव्य करण्यास मलिकांना मनाई
चांगले ‘निराशा बजेट’
आर्थिक दुर्बल घटकांना मिळणार 10 टक्के आरक्षण

गृहविक्रीच्या माध्यमातून 1 लाख 10 हजार 880 कोटींची उलाढाल

पुणे : कोरोनानंतर देशामध्ये घरांची विक्रमी विक्री होतांना दिसून येत आहे. त्यात पुणे आणि मुंबईमध्ये सर्वाधिक घरांची विक्री होतांना दिसून येत आहे. या नव्या वर्षांतील सुरूवातीच्या तीन महिन्यातच देशातील प्रमुख 8 शहरांत मिळून एकूण 1 लाख 20 हजार 640 घरांची विक्री झाली आहे. विशेष म्हणजे या गृहविक्रीच्या माध्यमातून तब्बल 1 लाख 10 हजार 880 कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे. गेल्यावर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत गृहविक्रीमध्ये 41 टक्क्याची वाढ झाली असल्याचे एका अहवालातून समोर आले होते. गेल्यावर्षी जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांच्या कालावधीमध्ये देशातील 8 प्रमुख शहरांत 85 हजार 840 घरांची विक्री झाली होती. देशात पहिल्या तीन महिन्यांत झालेल्या घरांच्या विक्रीमध्ये सर्वाधिक विक्री मुंबई आणि पुणे येथे झाली असून या शहरांतील गृहविक्रीचा आकडा 65 हजार 700 वर पोहोचला आहे. यापैकी मुंबईतील घरांची विक्री सर्वाधिक असून पहिल्या 3 महिन्यांत मुंबईत 41 हजार 590 घरांची विक्री झाली आहे. दुसर्‍या क्रमांकावर पुणे शहर असून पुण्यात एकूण 23,110 घरांची विक्री झाली आहे. गृहविक्रीमध्ये यापाठोपाठ हैदराबाद (14,290), अहमदाबाद (12,920), बंगळुरू (10,380), दिल्ली-एनसीआर (10,060), चेन्नई (4,430) आणि कोलकाता (3,860) या शहरांचा क्रमांक लागतो.

COMMENTS