Homeताज्या बातम्या

वेणुताई चव्हाण महिला महाविद्यालयाचे प्रा.डॉ.राजकुमार कांबळे यांचा सेवापूर्ती गौरव

अंबाजोगाई येथील वेणुताई चव्हाण कनिष्ठ महिला महाविधालयातील हिंदी विषयाचे प्रा.डॉ.राजकुमार नागनाथराव कांबळे सर प्रदीर्घ सेवेनंतर दि.30जुन रोजी सेव

क्रेडाईच्या वतीने कामगार कल्याण सप्ताहाचे आयोजन;श्रमिक सन्मान – आपले योगदान, आमचा अभिमान अंतर्गत विविध उपक्रम राबविणार-अंबाजोगाई क्रेडाईचे अध्यक्ष संजय सुराणा
आहात तसाच जीवनाचा स्विकार करा आपोआपच जीवन बदलेल-अ‍ॅड.श्रीकांत माळकरमहिला आत्मभान प्रशिक्षण शिबीराचे उध्दघाटन
धनादेश न वटल्याप्रकरणी आरोपीस एक वर्ष कारावास व 5.50 लाखांचा दंड


अंबाजोगाई येथील वेणुताई चव्हाण कनिष्ठ महिला महाविधालयातील हिंदी विषयाचे प्रा.डॉ.राजकुमार नागनाथराव कांबळे सर प्रदीर्घ सेवेनंतर दि.30जुन रोजी सेवानिवृत्त झाले.त्यानिमित्ताने महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालय हिंदी अध्यापक संघाच्यावतीने अंबाजोगाई येथील अनिकेत मंगल कार्यालयात  मान्यवरांच्या उपस्थितीत   सेवापूर्ती   गौरव सोहळा घेण्यात आला.या प्रसंगी प्रा.डॉ.राजकुमार कांबळे व अर्चना कांबळे यांचा सत्कार करून सन्मानपत्र प्रदान करण्यात आले.ङ्ग     यावेळी अध्यक्ष स्थानी महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालय हिंदी अध्यापक संघाचे राज्याध्यक्ष प्रा.डॉ.मिलिंद कांबळे, विशेष उपस्थिती गौतम कांबळे , महावीर गायकवाड, दिनकर सुरडकर , सुनिल मस्के, डॉ.नितिन कांबळे, गोरखनाथ सावंत,प्रा.सत्यांद्र पाटील,प्रा.रेवणनाथ कडले यांची उपस्थिती होती.अध्यक्षीय भाषणात प्रा.डॉ.मिलिंद कांबळे यांनी महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालय हिंदी अध्यापक संघाच्या कार्यात प्रा.डॉ.राजकुमार कांबळे यांनी दिलेले योगदानाचे कौतुक करून पुढेही संघाचे कार्य सुरूच ठेवावे असे सांगितले.तर सत्काराला उत्तर देताना वेणुताई चव्हाण महिला महाविद्यालयाचे संस्थापक स्व.भगवानराव लोमटे बापू यांच्या प्रेरणेमुळेच मला शिक्षणसह इतर क्षेत्रांत चांगले कार्य करण्याची संधी मिळाली अशा भावना प्रा.डॉ.राजकुमार कांबळे यांनी व्यक्त केली.समारंभाचे प्रस्तावीत प्रा.श्रीकांत कुलकण यांनी केले तर सुत्रसंचालन प्रा.पंजाबराव येडे तसेच आभार प्रदर्शन भगवान सरवदे सर यांनी केले.या सेवापूत गौरव सोहळास राज्यातून विविध भागातून मान्यवर स्नेही,संघटनेचे पदाधिकारी,मोठ्या संखेने मित्र-परिवार उपस्थित होते.

COMMENTS