Homeताज्या बातम्या

शाळा परिसरातील हुल्लडबाजांवर श्रीगोंदा पोलिसांची कारवाई

श्रीगोंदा : शालेय विद्यार्थी व विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत श्रीगोंदा पोलिसांनी शाळा व महाविद्यालयांच्या परिसरात विनाकारण फिरणाऱ्या, टवाळखोरी करणाऱ्या आणि गोंधळ घालणाऱ्या हुल्लडबाजांविरोधात बुधवारी (दि. १ जुलै) धडक कारवाई केली. या कारवाईत दोन संशयित तरुणांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.गेल्या काही दिवसांपासून शाळा भरण्याच्या व सुटण्याच्या वेळेत काही तरुण दुचाकींवरून शाळांच्या परिसरात वारंवार फेऱ्या मारत असल्याच्या तसेच मोठ्या आवाजात हॉर्न वाजवून व सायलेन्सरचा आवाज करून विद्यार्थ्यांना त्रास देत असल्याच्या तक्रारी पोलीस प्रशासनाकडे प्राप्त झाल्या होत्या. विशेषतः विद्यार्थिनींमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत असल्याने या प्रकाराची पोलिसांनी गंभीर दखल घेतली.पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाची स्थापना करण्यात आली. या पथकाने साध्या वेशातील महिला पोलीस व अंमलदारांच्या मदतीने शाळांच्या परिसरात सापळा रचत सकाळी व दुपारी शाळा सुटण्याच्या वेळेत विशेष मोहीम राबवली.या मोहिमेदरम्यान शाळेच्या प्रवेशद्वाराजवळ विनाकारण थांबलेल्या तरुणांची चौकशी करण्यात आली. तसेच ट्रिपल सीट प्रवास करणाऱ्या आणि सायलेन्सरमध्ये बदल करून मोठा आवाज करणाऱ्या दुचाकींवर कारवाई करत वाहने जप्त करण्यात आली. हुल्लडबाजी करणाऱ्या दोन तरुणांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणण्यात आले.ताब्यात घेतलेल्या तरुणांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली असून त्यांच्या पालकांनाही पोलीस ठाण्यात बोलावून समुपदेशन करण्यात आले. भविष्यात अशा प्रकारची टवाळखोरी अथवा शांतता भंग करणारे प्रकार केल्यास न्यायालयामार्फत कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.यावेळी पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी सांगितले की, “विद्यार्थ्यांची सुरक्षा ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे. शाळा किंवा महाविद्यालय परिसरात मुलींची छेड काढणे, विनाकारण फिरणे किंवा गोंधळ घालणे कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाही. अशा प्रकारांची माहिती नागरिकांनी किंवा विद्यार्थ्यांनी तात्काळ पोलीस नियंत्रण कक्ष अथवा ‘११२’ या हेल्पलाइनवर द्यावी. तक्रारदाराचे नाव गोपनीय ठेवले जाईल.”

जुन्या वादातून वळणमध्ये हत्या; राहुरी पोलिसांकडून संशयिताला तात्काळ अटक
समृद्धी महामार्गावर लुटमार करणारी आंतरजिल्हा टोळी जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई
राहुरी पोलीस ठाण्याच्या कारागृहात दारूचा शिरकाव? जेवण पुरवठादाराविरुद्ध गुन्हा, सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह
Shrigonda Student Attack News,कॉलेजात बसण्याच्या जागेवरून वाद झाला; दोन  तरुणांनी विद्यार्थ्याला बागेत नेले आणि... - ahmednagar: college student  beaten up by two youths in shrigonda ...

COMMENTS