Homeताज्या बातम्या

निष्ठा आणि कामाच्या बळावर गणेश बजगुडे पाटील यांची काँग्रेसच्या बीड तालुका अध्यक्ष पदी तिसर्‍यांदा फेरनिवड

बीड : काँग्रेस पक्षाचे नेते भावी पंतप्रधान राहुलजी गांधी यांच्या संकल्पनेतून संघटन सृजन अभियानाच्या माध्यमातून देशभरात पदाधिकार्‍यांच्या निवड प्र

वंगभूमीत फुलले कमळ; ममतांचा गड उद्ध्वस्त! प. बंगाल, आसाममध्ये भाजपची सत्ता तर केरळमध्ये काँगे्रसने मारली मुसंडी; तामिळनाडूमध्ये टीव्हीके; पदुच्चेरीमध्ये एनडीएची सत्ता
तृणमूलला धक्का; खा. सुष्मिता देव यांचा राजीनामा
नवनीत राणा जातीय विष पसरवणारी विषवल्ली;राणा-वडेट्टीवार वाद चिघळला; आरोप-प्रत्यारोपांची जोरदार फैर


बीड : काँग्रेस पक्षाचे नेते भावी पंतप्रधान राहुलजी गांधी यांच्या संकल्पनेतून संघटन सृजन अभियानाच्या माध्यमातून देशभरात पदाधिकार्‍यांच्या निवड प्रक्रिया पुढील कार्यकाळासाठी पक्ष संघटन अधिक मजबुत करत राहुलजी गांधी व काँग्रेस पक्षाचे विचार व कार्य तळागाळापर्यंत पोहचवण्यासाठी खर्‍या काम करणार्‍या कार्यकर्त्याला संधी देण्याचे काम या संघटन सृजन अभियानाच्या माध्यमातून करण्यात आले. या निवड प्रक्रियेसाठी बीड जिल्ह्यात निरीक्षक म्हणून ऑल इंडिया काँग्रेस कमिटीच्या वतीने नीतू वर्मा मॅडम (दिल्ली) यांच्यासह महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे एम एम शेख, सुरेंद्र गोडजकर, विद्याताई पाटील यांनी निरीक्षक म्हणून काम पाहिले. निरीक्षकांनी दिलेल्या प्रत्यक्ष अहवालातून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मा. हर्षवर्धन सपकाळ साहेब यांच्या माध्यमातून व काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या माजी खासदार रजनीताई पाटील व माजी मंत्री अशोकराव पाटील यांच्या नेतृत्वात बीड तालुका काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी गणेश बजगुडे पाटील यांची निवड करण्यात आली असुन काल युवा नेते आदित्य पाटील व जिल्हाध्यक्ष राहुल सोनवणे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी बोलताना गणेश बजगुडे पाटील म्हणाले की, मी मागील अनेक वर्षांपासुन बीड तालुका व मतदार संघात पुर्ण वेळ काम करत असुन माझे काम लोकांशी जोडलेली नाळ व पक्ष आणि नेत्या प्रती असलेली निष्ठा यामुळे मला आज तिसर्‍यांदा काँग्रेसच्या बीड तालुकाध्यक्षपदी काम करण्याची संधी मिळालेली आहे. मी पुढील काळात देखील आमच्या नेत्या माजी खासदार रजनीताई पाटील, माजी मंत्री अशोकराव पाटील, युवा नेते आदित्य पाटील व जिल्हाध्यक्ष राहुल सोनवणे यांच्या नेतृत्वात पक्ष संघटन अधिक मजबुत करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करेल त्याच बरोबर माझ्यावर टाकलेल्या विश्वासाला मी कधीही तडा जाऊ देणार नाही असे ही ते म्हणाले. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष प्रवीणकुमार शेप, बीड शहराध्यक्ष इलियास टेलर, इंटक जिल्हाध्यक्ष रामधन जमले, असंघटित कामगार काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संतोष निकाळजे, शिरूर तालुकाध्यक्ष भास्कर केदार, आष्टी तालुकाध्यक्ष शेख फारुक, पाटोदा तालुकाध्यक्ष राहुल जाधव, माजलगाव तालुकाध्यक्ष महावीर मस्के, युवक काँग्रेसचे हनुमान घोडके, विद्यार्थी काँग्रेसचे शेख मुशर्रफ, शिवाजी कोटुळे, मिलिंद मस्के, शेख मोहसिन, शेख जाहीर, योगेश बहिरवाल, योगेश कुंभारकर, पिनु डांगे, शिवाजी घुमरे, शेख अर्शद, शेख सोफियान आदी पदाधिकारी उपस्थित होते.

COMMENTS