Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ममता बॅनर्जीकडून सहानुभूतीचे राजकारण; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांचा आरोप

कोलकाता : पश्‍चिम बंगाल विधानसभा निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर राजकीय वातावरण तापले असून, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी कोलकाता येथील सभेत तृण

कोण होणार गुजरातचे नवे मुख्यमंत्री …
Nanded : कोणी सोडून गेल्याने भाजपाला फरक पडत नाही (Video)
मुंबई जिंकली, पण महापौर कोण? भाजप-शिंदे सेनेत पडद्यामागे हालचाली सुरू

कोलकाता : पश्‍चिम बंगाल विधानसभा निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर राजकीय वातावरण तापले असून, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी कोलकाता येथील सभेत तृणमूल काँग्रेस सरकार आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर जोरदार टीका केली. राज्यात गेल्या पंधरा वर्षांत भीती, भ्रष्टाचार आणि लांगुलचालनाचे वातावरण निर्माण झाले असून, आगामी निवडणुका ‘भीती की विश्‍वास’ यावर जनतेचा निर्णय ठरवतील, असे त्यांनी म्हटले.
अमित शाह यांनी या वेळी तृणमूल काँग्रेस सरकारविरोधात सविस्तर आरोपपत्र प्रसिद्ध केले. हे कोणत्याही एका पक्षाचे नसून, राज्यातील जनतेच्या भावना आणि अनुभवांचे प्रतिबिंब असल्याचा दावा त्यांनी केला. गेल्या पंधरा वर्षांत घडलेल्या कथित गैरव्यवहारांचे संकलन या आरोपपत्रात करण्यात आले असल्याचे ते म्हणाले. आपल्या भाषणात त्यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर सहानुभूतीचे राजकारण केल्याचा आरोप केला. वारंवार स्वतःला पीडित दाखवून जनतेची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला जातो, असे त्यांनी नमूद केले. कधी दुखापतींचे प्रसंग पुढे आणले जातात, कधी डोक्याला पट्टी बांधून भावनिक वातावरण तयार केले जाते, तर कधी आजारपणाचे कारण देत सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न होतो, असा टोला त्यांनी लगावला. या प्रकाराला जनता आता ओळखू लागली आहे, असेही ते म्हणाले. शाह यांनी पुढे सांगितले की, ही निवडणूक केवळ सत्तांतरासाठी नसून राज्यातील भीतीचे वातावरण दूर करण्यासाठी निर्णायक ठरणार आहे. राज्यातील नागरिकांना जीवित आणि मालमत्तेबाबत असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. महिलांच्या सुरक्षेचा प्रश्‍न गंभीर बनला असून, तरुण पिढीला भविष्याबाबत अनिश्‍चिततेचा सामना करावा लागत आहे, अशी टीकाही त्यांनी केली. तृणमूल काँग्रेस सरकारवर त्यांनी संघटित खंडणी आणि भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले. भ्रष्टाचार हा व्यवस्थेचा अविभाज्य भाग बनला असून, गुन्हेगारी प्रवृत्तीचे जाळे सर्व स्तरांवर पसरले आहे, असे ते म्हणाले. सामान्य नागरिकांवर अन्याय होत असून, उद्योगधंद्यांच्या अभावामुळे राज्याची प्रगती खुंटली असल्याचा आरोपही त्यांनी केला. सीमावर्ती भागांमधील अवैध स्थलांतराचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला. ही समस्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोकादायक ठरत असून, त्याला राजकीय आश्रय दिला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. सत्तांतर झाल्यास अशा घटकांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.

COMMENTS