श्रीगोंदा : चांडगावचे सुपुत्र तथा सध्या पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालय, आढळगाव येथे कार्यरत असलेले मच्छिंद्र भगवान चाकणे यांना रयत शिक्षण संस्थेचा प्रतिष्ठेचा “माजी प्राचार्य एन. आर. माने निष्ठावान गुणी रयत सेवक पुरस्कार २०२६” जाहीर झाल्याबद्दल लोकनेते राजेंद्र (आबा) म्हस्के मित्र मंडळाच्या वतीने चांडगाव येथे जाहीर सत्कार करण्यात आला.या सत्कार सोहळ्यास ग्रामस्थ व मान्यवरांनी मोठ्या उत्साहात उपस्थिती लावत मच्छिंद्र चाकणे यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याचा गौरव केला. कार्यक्रमावेळी लोकनेते राजेंद्र (आबा) म्हस्के यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, “शिक्षण क्षेत्रात निस्वार्थ भावनेने कार्य करणाऱ्या शिक्षकांचा सन्मान होणे ही समाजासाठी अभिमानाची बाब आहे. मच्छिंद्र चाकणे यांनी विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच संस्कारांची जोपासना करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले असून, त्यांना मिळालेला हा पुरस्कार संपूर्ण परिसरासाठी गौरवास्पद आहे.” यावेळी उपस्थित मान्यवरांनी मच्छिंद्र चाकणे यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा देत त्यांच्या कार्याची प्रशंसा केली.या कार्यक्रमास रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभाग सल्लागार समितीचे सदस्य राजेंद्र (आबा) म्हस्के, सरपंच शशिकांत जगताप, उपसरपंच महादेव म्हस्के, स्कूल कमिटी सदस्य दत्तात्रय वाघ, माजी व्हा. चेअरमन शिवाजीराव खामकर, व्हा. चेअरमन पंढरीनाथ चाकणे, प्रमोद म्हस्के, संतोष म्हस्के, संतोष शिवदास म्हस्के, अजित म्हस्के, संचालक बाळासाहेब लोंढे, सतीश म्हस्के, सोसायटी संचालक महेंद्र म्हस्के, संचालक भाऊसाहेब चाकणे, संचालक सुनील म्हस्के, न्यू इंग्लिश स्कूलचे प्रा. गायकवाड, माऊली महाराज म्हस्के यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

COMMENTS