भातकुडगाव फाटा : काही महिन्यापूर्वी झालेल्या राज्यस्तरीय मंथन प्रज्ञाशोध सामान्य ज्ञान परीक्षेत शेवगाव तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळ

भातकुडगाव फाटा : काही महिन्यापूर्वी झालेल्या राज्यस्तरीय मंथन प्रज्ञाशोध सामान्य ज्ञान परीक्षेत शेवगाव तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळेगाव (भायगाव ) च्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत यश संपादन केले आहे. शाळेतील चैतन्य शहाराम आगळे याने मंथन प्रज्ञाशोध सामान्य ज्ञान परीक्षेत तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे. या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे. या स्पर्धेत शाळेतील २९ विद्यार्थी पात्र ठरले आहेत. त्यामध्ये इयत्ता तिसरी -स्वरा प्रदीप लांडे, मयुरी संभाजी कडूस, इयत्ता चौथी – त्रिवेणी गणेश लोखंडे, साई लक्ष्मण पिंगळे तर इयत्ता दुसरी -सोनाक्षी सुभाष जऱ्हाड, श्रावणी वाल्मीक दुकळे,साई गणेश शेकडे या विद्यार्थी व विद्यार्थिनीं विशेष प्रविण्य मिळवले आहे. नेहमीच विविध स्पर्धेत प्राविण्य मिळवत यापूर्वीही शाळेने तालुका जिल्हा व राज्य पातळीवर चमकदार कामगिरी केली आहे. विद्यार्थ्यांना मिळत असलेले दर्जेदार शिक्षणामुळे परिसरातून विद्यार्थ्यांचा ओढा या शाळेकडे वाढत चालला आहे. नुकत्याच मंथन परीक्षेत मिळालेल्या यशाबद्दल यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळेचे मुख्याध्यापक संदीप आहेर, उपमुख्याध्यापक लक्ष्मण पिंगळे,भायगावचे सरपंच राजेंद्र आढाव, विकास सेवा संस्थेचे चेअरमन कल्याण आढाव, ऍड. सागर चव्हाण,पोलीस पाटील बबन सौदागर,शालेय व्यवस्थापन समितीचे शहाराम आगळे,रामेश्वर शेकडे, प्रदीप लांडे, ज्ञानेश्वर वडणे,संभाजी कडूस, तुकाराम लांडे, गणेश लोखंडे, रावसाहेब जऱ्हाड, गणेश दुकळे, नानासाहेब लांडे, आदिनाथ आढाव, नामदेव लोखंडे,अंबादास सांगळे, रोहिदास म्हसरूप यांच्यासह पालक व ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे.

COMMENTS