Homeताज्या बातम्याअहमदनगर

वसंत रांधवण यांना समाजरत्न पुरस्कार जाहीर

सुपा : पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील रहिवासी तथा अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे पारनेर तालुका उपाध्यक्ष आणि पत्रकार वसंत रांधवण यांची राज्यस्तरीय ‘समाजरत्न पुरस्कार २०२६’साठी निवड करण्यात आली आहे. आधार फाउंडेशन व एसआर २४ न्यूज मीडिया समूह, राहुरी-अहिल्यानगर यांच्या वतीने हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती आयोजक तथा कार्याध्यक्ष रमेश खेमनर यांनी निवडीचे पत्र देऊन दिली.शनिवार, दि. १३ जून २०२६ रोजी सकाळी ११ वाजता महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे आयोजित पुरस्कार सोहळ्यात विविध क्षेत्रातील मान्यवर, लेखक व कवी यांच्या हस्ते वसंत रांधवण यांना ‘समाजरत्न पुरस्कार २०२६’ प्रदान करून गौरविण्यात येणार आहे.वसंत रांधवण हे पारनेर तालुक्यात ग्रामीण भागातील प्रश्न निर्भीडपणे मांडणारे पत्रकार म्हणून ओळखले जातात. गेल्या अनेक वर्षांपासून त्यांनी पत्रकारितेत नाविन्यपूर्ण व आदर्श कार्य केले आहे. तसेच अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेत पारनेर तालुका उपाध्यक्ष म्हणूनही ते कार्यरत आहेत.समाजसुधारकांच्या जयंती साजऱ्या करणे, शैक्षणिक, सामाजिक व राजकीय क्षेत्रात सक्रिय सहभाग घेणे अशा विविध माध्यमांतून त्यांनी योगदान दिले आहे. मागील १७ वर्षांपासून सामाजिक कार्यात सातत्यपूर्ण योगदान दिल्याबद्दल त्यांच्या कार्याची दखल घेत हा राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.यापूर्वीही वसंत रांधवण यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. त्यांच्या या निवडीबद्दल परिसरातून अभिनंदन होत आहे. निवडीचे पत्र आधार फाउंडेशनचे सचिव सोमनाथ वाघ तसेच आयोजक तथा कार्याध्यक्ष रमेश खेमनर यांनी प्रदान केले.

चांभुर्डी गावाने जतन केला मराठेशाहीचा जिवंत इतिहासबुरुज, देवडी आणि दगडी पायऱ्यांसह ऐतिहासिक ‘वेस’ आजही सुस्थितीत
कलाक्षेत्रातील योगदानाबद्दल डॉ. शिंदे यांचा सत्कार
संगमनेर तालुक्याला भंडारदरा-निळवंडेचे पाणी द्याशेतकऱ्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन ; शेतीसाठी 11 तास दिवसा वीज देण्याची मागणी

COMMENTS