Homeताज्या बातम्याअहमदनगर

वीजबिल शून्यावर आणणारा विद्यार्थ्यांचा सोलर प्रोजेक्ट !सोनिया गांधी पॉलीटेक्निकच्या विद्यार्थ्यांची उल्लेखनीय कामगिरी

श्रीगोंदा : तुळजा भवानी सेवा प्रतिष्ठान संचलित सोनिया गांधी पॉलीटेक्निकच्या इलेक्ट्रिकल विभागातील तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी अंतिम वर्ष प्रकल्पांतर्गत सौरऊर्जेवर आधारित अभिनव “सोलर पॅनल पॉवर सिस्टम” यशस्वीरीत्या साकारत महाविद्यालयाचे वीजबिल शून्यावर आणण्याचा स्तुत्य प्रयत्न केला आहे. विद्यार्थ्यांच्या या पर्यावरणपूरक आणि ऊर्जा बचतीचा संदेश देणाऱ्या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या या प्रकल्पामध्ये सौरऊर्जेच्या साहाय्याने विद्युत निर्मिती करून महाविद्यालयातील काही विद्युत उपकरणे कार्यान्वित करण्यात आली. वाढत्या वीजदराच्या पार्श्वभूमीवर पर्यायी ऊर्जास्रोतांचा प्रभावी वापर करून ऊर्जा बचत कशी साधता येऊ शकते, याचे उत्कृष्ट उदाहरण विद्यार्थ्यांनी या प्रकल्पातून सादर केले आहे.या अभिनव प्रकल्पासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य अमोल नागवडे यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच इलेक्ट्रिकल विभाग प्रमुख प्रविण बाबर आणि विभागातील इतर प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांना सातत्याने तांत्रिक मार्गदर्शन करून प्रकल्प यशस्वी करण्यासाठी मोलाचे सहकार्य केले.विद्यार्थ्यांच्या या कौतुकास्पद कार्याची दखल घेत संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र  नागवडे तसेच अहमदनगर जिल्हा बँकेच्या संचालिका अनुराधा नागवडे यांनी प्रकल्पाला भेट देत विद्यार्थ्यांचे विशेष अभिनंदन केले.विद्यार्थ्यांनी केवळ शैक्षणिक दृष्टिकोन न ठेवता समाजोपयोगी आणि ऊर्जा संवर्धनाचा संदेश देणारा उपक्रम राबविल्याने या प्रकल्पाचे महत्त्व अधिक अधोरेखित झाले आहे. ग्रामीण भागात भविष्यात अशा सौरऊर्जा प्रकल्पांचा मोठ्या प्रमाणावर उपयोग होऊ शकतो, असा विश्वास शिक्षकांनी व्यक्त केला.या अभिनव प्रकल्पामुळे विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाची आवड, तांत्रिक ज्ञान आणि पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण होत असून महाविद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेतही मोलाची भर पडत आहे. विद्यार्थ्यांच्या या यशस्वी प्रयत्नामुळे सोनिया गांधी पॉलीटेक्निकने पुन्हा एकदा नावीन्यपूर्ण शिक्षण आणि तांत्रिक प्रगतीची परंपरा जपल्याचे दिसून आले आहे.

बाणेश्वर विद्यालयातील गुणवंतांचा आ. कर्डिलेंकडून सन्मान
डॉक्टरांनी सायकलवर केली पंढरपूर वारी
महिलेस मारहाण केल्याच्या खटल्यातून आरोपीची निर्दोष मुक्तता

COMMENTS