Homeताज्या बातम्या

मोहळकर हत्याकांडातील आरोपीला  ‘वैधानिक जामीन’  

जामखेड : महाराष्ट्रात गाजलेल्या सागर मोहळकर हत्याकांड प्रकरणाला आता एक नवे आणि धक्कादायक वळण मिळाले आहे. या गुन्ह्यातील अटक आरोपी अभिमन्यु महादेव

सोशल मीडियाच्या वादातून हल्ला
मिरजगाव परिसरात मृतदेह आढळला
सोनई पोलिसांची अवैध धंद्यांविरोधात कारवाई  
Jamkhed Firing Case Gangster Sagar Moholkar Dies During Treatment in Pune  Hospital |


जामखेड : महाराष्ट्रात गाजलेल्या सागर मोहळकर हत्याकांड प्रकरणाला आता एक नवे आणि धक्कादायक वळण मिळाले आहे. या गुन्ह्यातील अटक आरोपी अभिमन्यु महादेव पोते याला जामखेड न्यायालयाने अटी व शर्तींसह जामीन मंजूर केला आहे. कायदेशीर भाषेत याला ‘वैधानिक जामीन’  म्हटले जाते. विशेष म्हणजे, ज्या गंभीर गुन्ह्याचा जामीन केवळ सत्र न्यायालयात  होणे अपेक्षित होते, त्या आरोपीला पोलिसांच्या तांत्रिक चुकीमुळे जामखेडच्या कनिष्ठ न्यायालयातूनच जामीन मिळाला आहे. जामखेड न्यायालयाच्या इतिहासातील ही अशा प्रकारची पहिलीच घटना मानली जात आहे.
 कायद्यानुसार, अशा गंभीर गुन्ह्यांमध्ये अटक केल्यापासून ९० दिवसांच्या आत तपास अधिकाऱ्यांनी न्यायालयात दोषारोपपत्र (चार्जशीट) दाखल करणे बंधनकारक असते.
आरोपी अभिमन्यु पोते याच्या अटकेला ७ जून २०२६ रोजी ९० दिवस पूर्ण झाले होते. तपास अधिकारी पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांनी या मुदतीत किंवा ८ जून २०२६ (९१ व्या दिवशी) न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करणे गरजेचे होते, परंतु ते दाखल झाले नाही.
पोलिसांकडून दोषारोपपत्र दाखल करण्यास झालेली हीच तांत्रिक दिरंगाई आरोपीचे वकील ऍड. हर्षल डोके यांनी अचूक हेरली. त्यांनी तातडीने जामखेड न्यायालयाच्या न्यायाधीश यु. ए. भोसले  यांच्यासमोर आरोपीला ‘वैधानिक जामीन’ मिळण्यासाठी अर्ज दाखल केला. या अर्जावर न्यायालयाने कोर्टाचे नाझर यांचे म्हणणे मागवले असता, त्यांनीही न्यायालयात अद्याप कोणतीही चार्जशीट उपलब्ध झाले नसल्याचे स्पष्ट केले.
कोर्टासमोर सरकारी पक्ष आणि आरोपीच्या वतीने  डोके यांनी जोरदार युक्तिवाद केला.  कायदेशीर युक्तिवाद ग्राह्य धरून, न्यायाधीश भोसले यांनी आरोपी अभिमन्यु पोते याला अटी व शर्तींसह जामिनावर मुक्त करण्याचे आदेश पारित केले.”तसेच तपासी अधिकारी दशरथ चौधरी यांना चार्जसीट दाखल करायला उशिरा का झाला याबद्दल कारणे दाखवा नोटीस काढली”.

COMMENTS