Homeताज्या बातम्याअहमदनगर

व्याज परताव्यासाठी तातडीने निधी द्या : आ. तांबे

संगमनेर : महाराष्ट्रामध्ये अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामार्फत मराठा समाजातील युवकांना स्वयंरोजगार व उद्योग व्यवसायासाठी मोठ्या प्रमाणात कर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहे. मात्र मागील अनेक दिवसांपासून या युवकांना व्याज परतावा मिळत नसल्याने ते मोठ्या आर्थिक अडचणीत सापडले असून तातडीने या विभागाला निधी उपलब्ध करून देऊन त्वरित व्याज परतावा मिळावा अशी आग्रही मागणी नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी केली आहे.आमदार सत्यजित तांबे यांनी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, राज्यभरातील अनेक मराठा समाजातील युवकांना या महामंडळाच्या माध्यमातून स्वयंरोजगार व उद्योग व्यवसायासाठी मोठ्या प्रमाणात कर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहे. यामुळे अनेक तरुणांनी आपले स्वयंरोजगार व उद्योग व्यवसाय सुरू केले आहेत.मात्र महामंडळामार्फत कर्ज घेतलेल्या अनेक तरुणांना मागील  काही महिन्यांपासून निधीच्या अभावी व्याज परतावा मिळालेल्या नाही. उत्तर महाराष्ट्रात सह अहिल्यानगर जिल्हा आणि शिर्डी विभागातही मोठ्या प्रमाणात युवकांना या व्याज परतावा न मिळाल्याने तरुणांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. अनेक युवक व्याजामुळे आर्थिक अडचणीत सापडले आहेत. व्याज परतावा न मिळाल्यास संबंधित लाभार्थ्याच्या कर्ज खात्यावर अतिरिक्त आर्थिक भार पडत असून नवउद्योजकांमध्ये अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले आहे. व्याज परतावा मिळाल्याने या सर्व तरुणांना आर्थिक अडचणीतून बाहेर पडण्यास थोडी मदत होणार आहे. म्हणून सरकारने तातडीने अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला निधी उपलब्ध करून देऊन त्वरित बँकेचा व्याज परतावा देण्यात यावा अशी आग्रही मागणी आ. तांबे यांनी केली आहे.

कोपरगाव तालुक्यातील २१ ग्रामपंचायतीची तपासणी
वीजप्रश्न आंदोलनातील मोर्चेकरी १६ वर्षानंतर निर्दोष  
कर्जत तालुक्यात वादळी पावसाचा तडाखापिकांसह घरांचे मोठे नुकसान; एक गाय दगावली

COMMENTS