Homeताज्या बातम्या

छत्रपती संभाजीनगरातील प्रसिद्ध ‘उत्तम उपहार गृह’ एफडीएकडून सील; अस्वच्छता आणि गंभीर त्रुटींमुळे परवाना निलंबित

छत्रपती संभाजीनगर: राज्यात गेल्या दोन महिन्यात अन्न व औषध प्रशासन विभागाने धडाकेबाज कारवाईला सुरुवात केली आहे. सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांनी प

नवरदेवाच्या वडिलांवर लोखंडी रॉडने हल्ला; संगमनेर तालुक्यातील सतेचीवाडी येथील वरातीत धुमाकूळ
संत गोरोबा काकांच्या ७५९ व्या जयंतीनिमित्त नांदेडमध्ये भव्य शोभायात्रा; गुणवंतांचा होणार गौरव
८० मोजा आणि पाणी प्या! किनवटमध्ये दुधाच्या दरवाढीसोबत भेसळीचा ’धंदा’ जोरात; अन्न व औषध प्रशासन कुंभकर्णी झोपेत?
Chhatrapati Sambhajinagar: Uttam Upahar Gruh License Suspended by FDA

छत्रपती संभाजीनगर: राज्यात गेल्या दोन महिन्यात अन्न व औषध प्रशासन विभागाने धडाकेबाज कारवाईला सुरुवात केली आहे. सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यापासून अवैध गुटखा आणि हॉटेल व्यवसायिकांवर धडाकेबाज कारवाई करण्यात येत आहे. त्यातच, एफडीएने आता छत्रपती संभाजीनगर शहराला इमरतीची ओळख देणाऱ्या प्रसिद्ध ‘मे. उत्तम उपहार गृह’वर धाड टाकून गंभीर त्रुटी आढळल्याने आस्थापना थेट सील केली आहे.

छाप्यादरम्यान उघड झालेलं वास्तव अत्यंत धक्कादायक असून ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या गोड पदार्थांच्या मागे आरोग्याशी थेट खेळ सुरू असल्याचं समोर आलं आहे. तपासणीत आढळलेल्या गंभीर अनियमितता खालीलप्रमाणे:

  • परवान्यात तफावत: हॉटेलचा परवाना ‘रेस्टॉरंट’ प्रकारचा असताना तेथे मिठाईचे उत्पादन केले जात होते, ज्यासाठी उत्पादकाचा स्वतंत्र परवाना आवश्यक होता.
  • असुरक्षित तेल व तूप: समोसे, भजी तळण्यासाठी वापरलेले तेल वारंवार वापरले जात होते (TPC तपासणीत BR रीडिंग ५८ आढळले). तसेच इमरती व जिलेबीसाठी वापरलेले वनस्पती तूपही पुन्हा पुन्हा वापरले जात होते (BR रीडिंग ३६).
  • अस्वच्छता व किडे: अन्न तयार करण्याच्या ठिकाणी झुरळांचा वावर आढळला असून पेस्ट कंट्रोलची कोणतीही नोंद नव्हती. कचरापेटी उघडी होती आणि खिडक्यांना जाळ्या नव्हत्या.
  • आरोग्यास घातक परिस्थिती: इडलीसाठी आंबवलेले पीठ थेट ड्रेनेज लाईनजवळ उघड्यावर ठेवलेले होते. भिंतींवर जळमटं, काळा थर आणि तंबाखू थुंकल्याच्या खुणा आढळल्या.
  • कायद्याचे उल्लंघन: मिठाईत वापरल्या जाणाऱ्या कृत्रिम रंगाच्या प्रमाणाची कामगारांना माहिती नव्हती. तसेच २५ ते ३० कामगारांचे ‘मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट’ उपलब्ध नव्हते.

या सर्व गंभीर त्रुटींमुळे एफडीएने हॉटेलचा परवाना तात्काळ निलंबित करून आस्थापना बंद केली आहे. तसेच वापरलेले तेल आणि वनस्पती तुपाचे नमुने पुढील तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत.

COMMENTS