नाळवंडी : नाळवंडी गावातील उमदा आणि सर्वसमावेशक नेतृत्व म्हणून स्व. संतोष राऊत यांची ओळख होती. त्यांच्या अकाली निधनामुळे गावाच्या राजकारणात एक पोक

नाळवंडी : नाळवंडी गावातील उमदा आणि सर्वसमावेशक नेतृत्व म्हणून स्व. संतोष राऊत यांची ओळख होती. त्यांच्या अकाली निधनामुळे गावाच्या राजकारणात एक पोकळी निर्माण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर वार्ड क्रमांक 3 मध्ये ग्रामपंचायत पोटनिवडणूक जाहीर झाली असून, या निवडणुकीकडे गावाचे लक्ष लागले आहे.
या निवडणुकीत दोन उमेदवार रिंगणात असून, ही निवडणूक बिनविरोध व्हायला हवी होती, मात्र विकासकामांमध्ये अडथळा निर्माण झाल्यामुळे ती बिनविरोध होऊ शकली नाही, असे मत व्यक्त करण्यात येत आहे. स्व. संतोष राऊत यांचे गाव विकासाचे स्वप्न पुढे नेण्यासाठी त्यांच्या कुटुंबातील रंगनाथ (बाबू) राऊत यांना संधी द्यावी, असे आवाहन गणेश राऊत यांनी केले आहे. त्यांच्या मते, रंगनाथ (बाबू) राऊत हे गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सक्षम असून, भविष्यात ते आत्मीयतेने गावसेवा करू शकतात. गणेश राऊत यांनी पुढे सांगितले की, रंगनाथ (बाबू) राऊत हे वार्ड क्रमांक 3 मधील रहिवासी असून जनतेसाठी 24 तास उपलब्ध राहणारे नेतृत्व आहेत. त्यामुळे नाळवंडी गावातील जनतेने त्यांना एक वेळ सेवा करण्याची संधी द्यावी, असे भावनिक आवाहनही त्यांनी केले. या पोटनिवडणुकीत रंगनाथ (बाबू) राऊत यांना मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

COMMENTS