कर्जत : भारतीय जनता पक्षाच्या अहिल्यानगर जिल्हा ओबीसी मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी कर्जत तालुक्यातील आळसुंदे येथील काकासाहेब महादेव अनारसे यांच

कर्जत : भारतीय जनता पक्षाच्या अहिल्यानगर जिल्हा ओबीसी मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी कर्जत तालुक्यातील आळसुंदे येथील काकासाहेब महादेव अनारसे यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीचे अधिकृत पत्र जिल्हाध्यक्ष दादासाहेब सोनमाळी यांनी प्रदान केले.
काकासाहेब अनारसे हे कर्जत तालुक्यातील आळसुंदे या गावातील सक्रिय व निष्ठावंत भाजप कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. त्यांनी गेल्या अनेक वर्षांपासून पक्षासाठी प्रामाणिकपणे काम करत विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. पोलिंग एजंटपासून सुरुवात करत त्यांनी बूथ प्रमुख, शक्ती केंद्रप्रमुख तसेच तालुका उपाध्यक्ष अशी महत्त्वाची पदे यशस्वीपणे भूषवली आहेत. त्यांच्या सातत्यपूर्ण व निष्ठावान कार्याची दखल घेत पक्षाने त्यांच्यावर जिल्हा उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे.
या निवडीबद्दल विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी खासदार सुजय विखे पाटील, जिल्हाध्यक्ष दादासाहेब सोनमाळी यांच्यासह काकासाहेब तापकीर, शांतीलाल कोपनर, अनिल गदादे, अशोक खेडकर, काकासाहेब धांडे, प्रसाद ढोकरिकर, सरपंच जिजा बापू अनारसे, राहुल देमुंडे, संदीप अनारसे, अतुल अनारसे, सावता अनारसे, शरद अनारसे, विकास वाघ, बाळासाहेब अनारसे, हनुमंत अनारसे आदींसह तालुका व जिल्ह्यातील भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

COMMENTS