Homeताज्या बातम्या

खरवंडी परिसरात स्वतंत्र पोलीस ठाण्याची स्थापना करा; किसन आव्हाड यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन, १२ जून रोजी रास्ता रोकोचा इशारा

खरवंडी कासार : खरवंडी परिसरातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी येथे स्वतंत्र पोलीस ठाण्याची स्थापना करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते किस

सासरच्या छळाला कंटाळून देवळाली प्रवरा येथील विवाहितेची पुण्यात आत्महत्या; पतीसह दोघे गजाआड
पाथर्डीत चोरट्यांचा सुळसुळाट; बंद घर फोडून ७० हजारांची रोकड लंपास
राहुरी विटंबना प्रकरण: आरोपीचा सुगावा देणाऱ्यास पोलिसांकडून ११ हजारांचे बक्षीस; शिवप्रेमींकडून मात्र सवाल
खरवंडी परिसरात स्वतंत्र पोलिस ठाण्याची स्थापना करावी : आव्हाड - Lokmanthan  | लोकमंथन

खरवंडी कासार : खरवंडी परिसरातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी येथे स्वतंत्र पोलीस ठाण्याची स्थापना करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते किसन आव्हाड यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. तसेच खरवंडी पोलीस दूरक्षेत्रात दीर्घकाळ कार्यरत असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांची तातडीने बदली करून त्यांच्या जागी कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याची मागणीही त्यांनी लावून धरली आहे.

निवेदनात नमूद केल्यानुसार, खरवंडी हे पाथर्डी तालुक्यातील महत्त्वाचे व्यापारी केंद्र असून मराठवाड्याचे प्रवेशद्वार म्हणून ओळखले जाते. परिसरात प्रसिद्ध तीर्थक्षेत्र भगवानगड असल्याने राज्यासह परराज्यातून भाविक मोठ्या संख्येने येतात. तसेच राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २२२ आणि पैठण-पंढरपूर पालखी मार्ग याच भागातून जात असल्याने येथे वाहनांची मोठी वर्दळ असते. मात्र, गेल्या काही दिवसांत परिसरात चोरी, दरोडे, रस्तालूट आणि अवैध व्यवसायांमध्ये मोठी वाढ झाली असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण मिळवण्यासाठी या भागात कायमस्वरूपी अधिकारी, आवश्यक मनुष्यबळ आणि वाहनाची सुविधा उपलब्ध करून स्वतंत्र पोलीस ठाणे मंजूर करावे, अशी मागणी आव्हाड यांनी केली आहे. अलीकडेच परिसरातील गावांमध्ये झालेल्या दरोड्यांतील आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणीही त्यांनी केली. प्रशासनाने या मागण्यांवर तातडीने पावले न उचलल्यास खरवंडी परिसरातील नागरिकांच्या वतीने १२ जून २०२६ रोजी राष्ट्रीय महामार्गावर ‘रास्ता रोको’ आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही या निवेदनातून देण्यात आला आहे.

COMMENTS