Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वांबोरीतील जनता दरबारात दिव्यांग महिलेला ना.तनपुरे यांनी दिले स्वतः रेशनकार्ड

देवळाली प्रवरा /प्रतिनिधी राहुरी तालुक्यातील वांबोरी गावात आज शनिवारी जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते. या दरबारात नागरिकांनी उपस्थित केलेल्या वि

केज च्या बस स्थानकावर 85 वर्षीय वृध्द महिलेचा मृत्यू ! l LokNews24
अवैधरित्या गोमांस विक्री करणारे आरोपी जेरबंद
देवळाली प्रवरा नगरपरिषदेत ’सेल्फी विथ व्होट स्पर्धा’

देवळाली प्रवरा /प्रतिनिधी राहुरी तालुक्यातील वांबोरी गावात आज शनिवारी जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते. या दरबारात नागरिकांनी उपस्थित केलेल्या विविध प्रश्नांचा जागेवरच निपटारा करण्यात आला तर काही प्रलंबित प्रश्नांना संबंधित विभागाला तातडीचे निर्देश देत समस्याचे निराकरण करण्याचे फर्मान सोडले. मागील वेळी जनता दरबारात दिलेल्या आश्‍वासनांची पूर्तता करण्यात आली. एका दिव्यांग महिलेने रेशनकार्ड मिळावे यासाठी निवेदन दिले होते. त्याची पूर्तता दरबारात करत नगर विकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी स्वतः रेशन कार्डची प्रत घेऊन आले व त्यांना सुपूर्द केली. यावेळी झालेल्या दरबारात मंत्री तनपुरे यांनी सांगितले की जनसामान्यांच्या अडचणी जाणून घेणे आणि त्यावर उपाययोजनात्मक कार्यवाही करणे यासाठी संपूर्ण यंत्रणा सक्रियतेने काम करत आहे. आजही वांबोरी येथील वहिवाट रस्ते, घरकुल योजना, अन्न धान्य कुपन, निराधार योजना, विविध दाखले व महावितरणच्या अनेक समस्या जाणून घेतल्या व प्रश्न सोडविण्याचे प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. समस्या लहान असो की मोठी ती मार्गी लावण्यासाठी मी प्रयत्नशील आहे. या खेपेला सुमारे २००च्या वर निवेदनांवर त्वरित कार्यवाही करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत. या जनता दरबारात मोठ्या प्रमाणात नागरिकांनी सहभाग नोंदवला आणि समाधानाने घरी परतले. यात आनंद व्यक्त केल्याचे अधिक समाधान लाभले असल्याचे नमूद केले. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब झिटे, माजी सरपंच नितीन बाफना, एकनाथ ढवळे, किसन जवरे, सुरेश बाफना, माजी उपसरपंच ऋषिकेश मोरे, भागवतराव पागिरे, बंटी वेताळ, तहसीलदार फसीउद्दीन शेख, मंत्री तनपुरे यांचे स्वीय सहाय्यक किरणकुमार काकडे, रवींद्र मांडे, अमोल गुलदगड उपस्थित होते.

COMMENTS