Homeताज्या बातम्या

खाकीचा ‘धाक’ अवघ्या 24 तासांचा; ‘खर्रा’ शौकीन कंगाल, तर प्रशासनाची ‘हप्तेबाजी’ मालामाल?

किनवट : ‘कायदा आणि सुव्यवस्था’ ही पुस्तकात वाचायला किती छान वाटते! पण, किनवटच्या गल्ल्यांमध्ये फेरफटका मारला की, या शब्दांचे अर्थ 10 रुपयांच्या र

खंडोबाची वाकडी येथील दिंडी सोहळ्याचे प्रस्थान
बिबट्याने पाडला दोन कालवडीचा फडशा
शेतकर्‍यांच्या ऐतिहासिक लढयाला बळ !
संवेदना - तक्रार निवारण पोर्टल

किनवट : ‘कायदा आणि सुव्यवस्था’ ही पुस्तकात वाचायला किती छान वाटते! पण, किनवटच्या गल्ल्यांमध्ये फेरफटका मारला की, या शब्दांचे अर्थ 10 रुपयांच्या र्खर्याप्रमाणे मळून फेकून दिलेले आढळतात. कालपर्यंत ज्या खाकीच्या हुंकाराने बेकायदेशीर अड्ड्यांचे धुरळे उडाले होते, आज त्याच खाकीच्या सावलीत धाडसाचे नवे ‘कारखाने’ थाटले गेले आहेत. कारवाईचा धाक हवेत विरला आणि 24 तासांतच पोलिसांच्या नाकाखाली पुन्हा एकदा र्खर्याचा धूर निघू लागला आहे. 7 जुलै रोजी रामनगर भागात ताशांच्या गजरात धाड पडली! 51 हजार 420 रुपयांचा मुद्देमाल जप्त झाला, सात जणांवर गुन्हे दाखल झाले. उपविभागीय पोलीस अधिकारी (डी.वाय.एस.पी.) चंद्रशेखर कदम यांच्या विशेष पथकाने उगारलेला हा आसूड पाहून 8 जुलैला संपूर्ण तालुका सुन्न झाला; पानटपर्‍यांचे शटर खाली आले. वाटले, आता खाकीचा धाक कायमचा प्रस्थापित झाला! पण हाय रे नशीब! हा धाक म्हणजे जणू सकाळी पडलेले स्वप्न ठरले. 9 जुलैची प्रभात उजाडली अन् शटर पुन्हा वर सरकले. फरक एवढाच, काल जो खर्रा 10 रुपयांना मिळायचा, आज तोच ‘कायद्याच्या भीतीचा कर’ लावून तब्बल 30 रुपयांना विकला जात आहे. खर्रा खाणार्‍या शौकीनांच्या खिशाला चांगलीच कात्री लागली आहे, पण बिचारे शौकीन तरी काय करणार? गर्दी अशी उसळली आहे, जणू मोफत वाटप सुरू आहे; अन् हे सर्व कुठे? तर अगदी किनवट पोलीस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर! पोलीस स्टेशनच्या बाजूलाच गर्दी जमावी आणि पोलिसांना ती दिसू नये, याला ‘डोळ्यांवर झापड’ म्हणावे की ‘आशीर्वादाचा हात’? नवनियुक्त एसडीपीओ चंद्रशेखर कदम यांनी पहिल्याच पत्रपरिषदेत किनवट 100% अवैध धंदेमुक्त करणार असा खणखणीत इशारा दिला. ’सजग नागरिक हीच ताकद’ म्हणत 9975679733 हा हेल्पलाईन नंबरही जाहीर केला. पण, नागरिक सजग होण्याआधीच गल्लीबोळांतील बेकायदेशीर कारखाने अधिक सजग आणि ‘सक्रिय’ झाले आहेत. शहरात सध्या एकच चर्चा रंगली आहे-कारवाईनंतर पोलिसांचे हप्ते वाढले, म्हणून र्खर्याचे भाव तिप्पट झाले! हप्त्यांची रसद थेट पोहोचल्याने अवैध धंदेवाल्यांचे मनोबल अधिकच उंचावले आहे. पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन आणि डीआयजी शहाजी उमाप यांच्या नेतृत्वाखाली आखलेला ’क्शन प्लॅन’ कागदावर कितीही वाखाणण्याजोगा असला, तरी प्रत्यक्ष जमिनीवर मात्र खाकीचा धाक चारच दिवसांचा हेच उघड होत आहे. आता प्रश्न हाच उरतो-हेल्पलाईनवर कॉल करून नागरिक गुप्त माहिती देतीलही; पण ज्या पोलिसांच्या नाकाखाली हा सगळा खेळ रंगतोय, त्यांना ही गर्दी दिसण्यासाठी कोणत्या ‘चष्म्याची’ गरज आहे?

COMMENTS